Rohit Pawar | फडणवीसांनी अजित पवारांच्या रद्द केलेल्या जीआर वरुन रंगले राजकारण; रोहित पवारांनी लगावला खोचक टोला

पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar) हे दोघेही उपमुख्यमंत्र्यांची भूमिका पार पाडत आहे. अजित पवार हे भाजपा- शिवसेना (BJP-ShivSena) युतीमध्ये सामील झाल्य़ाने अनेक राजकारण्यांचे धाबे दणाणले आहे. जोरदार कामाला लागलेल्या अजित पवारांबद्दल भाजप नेत्यांकडून तक्रारी येऊ लागल्या आहेत. दरम्यान, अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील कारखानदारांसंबंधित एक जीआर काढत निर्णय जाहीर केला होता. मात्र एका उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय हा दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी अगदी आठ दिवसांमध्ये बदलल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहे. या ‘ट्रीपल इंजिन’ सरकारमध्ये वादविवाद सुरु असून एकमेंकांना शह देण्याचे काम सुरु असल्याचा घणाघात केला जात आहे. यावर आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील अजित पवार यांना खोचक टोला लगावला असून सरकारवर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी काढलेला जीआर हा फडणवीसांनी रद्द केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आ. रोहित पवार म्हणाले आहे की, “भाजपला सरकारचा पैसा असाच वाटायचा आहे. या लोकांनीच कारखाना व कारखानदारी अडचणीत आणली आहे. आता त्यांना असाच पैसाच घ्यायचा आहे. यावर जाचक अटी आणाव्यात म्हणून अजितदादांनी जीआर काढला तो जीआर हा आठच दिवसात परत घेण्यात आला. याचा अर्थ या सरकारमध्ये काहीच अलबेल चालू नाही असं दिसत आहे. असा खोचक टोला रोहित पवार यांनी सरकारला लगावला आहे.

पुढे ते म्हणाले की, “भाजप आपल्या आमदारांना सांभाळण्यासाठी आणि आपल्या आमदारांच्या कारखान्यांना अशाप्रकारे
पैसा देत आहे. आपल्या नेत्याच्या कारखान्यांना सोडून बाकी कोणत्याही कारखान्याला भाजप मदत देत नाही,
असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) देवेंद्र फडणवीस व भाजपावर केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर

Devendra Fadnavis | सत्तेमध्ये आणि विरोधामध्ये दोन्हीकडे राष्ट्रवादीच, ही खेळी शरद पवारांची; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Chandrapur Pune Bypoll Election | पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुक होण्याची शक्यता कमी, सूत्रांची माहिती