Rohit Pawar On Ajit Pawar | ”वयस्कर काका, आजोबांना बाहेर काढणे आपली संस्कृती नाही, युगेंद्र याच विचाराने…”, रोहित पवारांचा अजितदादांना टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Pawar On Ajit Pawar| काल अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group) कार्यालयाला दिलेली भेट चर्चेत आहे. युगेंद्र यांनी यापुढे साहेब सांगतील तसेच होणार, असेही म्हटले आहे. यामुळे काकांची साथ सोडून युगेंद्र हे आजोबा शरद पवार यांच्यासोबत मैदानात उतरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर आज आमदार रोहित पवार (Rohit Pawar On Ajit Pawar) यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले, युगेंद्र बारामतीच्या ऑफिसला गेला होता. आजोबांना त्याने पाठिंबा दिला ही चांगली गोष्ट. आपली संस्कृती हीच आहे की वडिलधाऱ्यांबरोबर राहणे आपली जबाबदारी आहे. लहानपणापासूनच हे शिकवले जाते.

वडील आणि आजोबांना वयस्कर झाल्यावर बाहेर काढायचे हे आपल्या संस्कृतीत नाही. युगेंद्रचे विचारही तसेच आहेत, हे पाहिल्यानंतर या नातवालासुद्धा आवडलंच आहे. संस्कृती जपणे आपली जबाबदारी आहे. स्वतःच्या हितासाठी काकांना, नेत्यांना सोडून जात आहेत ही आपली संस्कृती नाही, असा टोला रोहित पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांना लगावला.

रोहित पवार म्हणाले, कुटुंब म्हणून अजितदादांना आम्ही खूप पूर्वीपासून ओळखतो.
शरद पवारांनी अजित पवारांना मोठी ताकद दिली. अनेक मोठ- मोठी पदे अजित दादांना मिळाली. व्यक्तिगत जीवनातही त्यांची झालेली प्रगती पाहिली. परंतु, प्रगती झाल्यानंतर साहेबांना सोडून जाणे, साहेबांनी बांधलेल्या घरातून साहेबांना बाहेर काढणे हा निर्णय त्यांनी घेतला तो कुटुंबाला नाही आवडला.

रोहित पवार म्हणाले, अजित पवारांचा निर्णय जर कुटुंबालाच नसेल आवडला तर सामान्य लोकांना कसा आवडेल?
परंतु, अजितदादांची जागा कोणी घेत नाही. मी तर लांबचा पुतण्या आहे. युगेंद्र तरी सख्खा पुतण्या आहे.
युगेंद्रने साहेबांची भूमिका घेतली. पवारांची भूमिका युगेंद्रने सोडली नाही, त्यामुळे कुटुंब अजित पवारांना एकटं पाडत नाही तर,
कुटुंबाला एकटं पाडून ते सत्तेत गेले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

‘आम्ही येथील भाई आहोत’, पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड, नऱ्हे परिसरातील प्रकार

‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Shiv Sena UBT MP Sanjay Raut | मोदींइतकी श्रीमंती ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नाही, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी