Video : रोहितने ‘असा’ उधळला बाद करण्याचा कट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या आयपीएलमध्ये वेगवेगळे किस्से आणि दृश्य पाहायला मिळत आहेत. असाच काहीचा मजेशीर आणि चतुराईचा किस्सा आज क्रिकेटच्या चाहत्यांना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना सुरु होता. यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने खेळताना आपल्याला बाद करण्याचा गोलंदाजाचा मनसुबा हानून पाडला आहे. त्याने ज्या पद्धतीने हे कृत्य केले त्यावरून चाहत्यांना हसू आवरले नाही.

मुंबईच्या संघाने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १८८ धावांचं आव्हान दिले होते. ते राजस्थानने जोस बटलरच्या साथीने सहज पूर्ण केलं. राजस्थानने ४ गडी राखून मुंबईवर विजय मिळवला. रोहितने या सामन्यात कमबॅक करत आश्वासक खेळी केली. मात्र ती पुरेशी ठरली नाही. मात्र या सामन्यात रोहितची चतुराई त्याच्या चाहत्यांना पाहता आली. त्यामुळे त्याचे कौतुकही होत आहे.

दहाव्या षटकात कृष्णप्पा गौथमच्या गोलंदाजीवर रोहित ४४ धावांवर खेळत होता. तेव्हा रोहितची खेळी थांबवण्यासाठी कृष्णप्पा गौथमने लेग साईडला बॉल टाकत, रोहितला स्टम्पिंग करण्याची संधी निर्माण केली. यष्टीरक्षक संजू सॅमसन या संधीसाठी पुढे सरसावलाही होता. मात्र अनुभवी रोहितला गौथमची ही युक्ती लगेच कळली आणि त्याने पायाने चेंडूची दिशा बदलली आणि आपली विकेट घेण्याचा प्लान हाणून पाडला. हे दृष्य पाहून मैदानावर काही काळ हसू पसरले होते. रोहितचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, आश्वासक खेळी करूनही मुंबईच्या संघाला हार पत्करावी लागली. त्यामुळे मुंबईचे चाहते नाराज झाले आहेत. परंतू रोहितने केलेली खेळी ही मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंदाचीच बाब आहे. मुंबईला पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी रोहितची गरज होतीच.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us