RRR Box Office Collection | पहिल्याच दिवशी RRR चित्रपटानं पार केला 200 कोटीचा आकडा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शुक्रवारी म्हणजे काल ‘आर आर आर (RRR Box Office Collection)’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये रामचरण (Ram Charan), ज्यूनियर एनटीआर (Junior NTR), अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटासाठी अनेक चाहते आतुर झाले होते. अनेक चाहत्यांनी चित्रपटासाठी आगाऊ बुकिंग (RRR Box Office Collection) केलं होत.

‘आर आर आर (RRR)’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे. अवघ्या पहिल्याच दिवशी या चित्रपटानं कमाईचा रेकॉर्ड (RRR Movie Breaks Record) तोडला आहे. चित्रपटानं हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये मिळून तब्बल 156 करोड इतकी कमाई केली आहे. तसेच विदेशामध्ये सुद्धा या चित्रपटानं जोरदार धुमाकूळ घातला असून, तब्बल 24.56 करोड इतक्या रुपयांची कमाई केली आहे. लंडनमध्ये 2.40 इतकी कमाई केली आहे. पूर्ण जगभरात या चित्रपटानं 223 करोड एवढ्या रकमेचा व्यवसाय केला आहे.

दरम्यान, या चित्रपटानं चक्क पहिल्याच दिवशी 200 करोडचा आकडा पार केला आहे. तसेच चित्रपटाबद्दल बोलायचं झाले तर, हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. अनेक प्रेक्षकांंनी पहिल्याच दिवशी चित्रपटासाठी थिएटर फुल केले होतं. तर अनेक प्रेक्षकांनी चित्रपटगृहातून बाहेर आल्यानंतर चित्रपटाच तोंड भरून कौतुक केलं.

Web Title :- RRR Box Office Collection | rrr box office collection day 1 directed by ss rajamouli starrign junior ntr ram charan and alia bhatt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा