गणेश उत्सवात किंवा विसर्जन मिरवणुकीत मद्यसेवन केल्यास कठोर कारवाई-आर.के.पद्मनाभन

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन 

पिंपरी चिंचवडमधील गणेशोत्सव दरम्यान आणि विसर्जन मिरवणुकीत मद्यसेवन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पिंपरी-चिंचवड पोलीस हे कठोर कारवाई करणार असल्याचे शहराचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी आदेश दिले आहेत.त्यामुळे तळीरामांचे धाबे दणाणले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4fe2ad03-bbcf-11e8-b28c-dde8889d8d69′]

शहरात मोठ्या भक्ती भावाने उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे.मात्र गेल्या काही वर्षांपासून उत्सवाचे रूप बदलले आहे.डीजे वरील गाण्यांच्या ठेक्यावर थिरकण्यासाठी अनेक उत्साही कार्यकर्ते हे मद्यपान सेवन करतात.त्यामुळे गणेश उत्सवाला गालबोट लागते,त्याचबरोबर किरकोळ वाद होत असतात याचेच रूपांतर हाणामारीत होत असते.त्यामुळेच पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी तळीरामांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

तिजोरीत खडखडाट असल्याने निवडुकीसाठी काँग्रेस मागणार जनतेकडे पैसे

तळीरामांमुळं उत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.प्रत्येक मंडळाची पोलिसांकडून रोज झाडाझडती घेतली जाते,तर विसर्जन मिरवणुकीवेळी मंडळांवर नजर ठेवण्यासाठी तीन ते चार ठिकाणी चेक पॉईंट उभारले जाणार आहेत.या तपासणीत तळीराम आढळल्यास पोलीस त्यांना ताब्यात घेणार असल्याचं ते म्हणाले आहेत.त्यामुळे या गणेश मिरवणुकीत अनुचित प्रकरणावर आळा बसणार आहे हे नक्की.

पुणे जिल्ह्यात पूनर्वसन विभागाच्या बनावट आदेशाचा सुळसुळाट