पहिल्यांदाच रूना साहाने बनवला कौन बनेगा करोडपती-12 मध्ये ‘हा’ इतिहास

नवी दिल्ली : टेलिव्हिजनचा पॉप्युलर गेम रियलिटी शो कौन बनेगा करोडपतीद्वारे अनेक लोकांनी आपली स्वप्न पूर्ण केली आहेत. या 12 व्या सीझनमध्ये सुद्धा अनेक खेळाडूंनी अमिताभच्या प्रश्नांना उत्तरं देऊन मोठी रक्कम जिंकली आहे. बिग बींच्या समोर हॉटसीटवर पोहचण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला एका फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंडमधून जावे लागते, ज्याचे पहिले उत्तर देणारी व्यक्ती हॉटसीटवर जाऊ शकते. परंतु, नुकत्याच झालेल्या शोची स्पर्धक रूना साहाने उत्तर न देताच हॉटसीटवर पोहचून केबीसी शोचा इतिहास बदलला.

कसा बदलला इतिहास
कोरोना गाईडलाइन्समुळे 10 ऐवजी अवघ्या 8 स्पर्धकांसाठी जागा बनवण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याला येथे काही व्यक्तींना बोलावले जाते, ज्यांच्यामध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा सामना होतो. या आठवड्यात सात स्पर्धक अगोदरच हॉटसीटवर पोहचले होते. जेव्हा त्यांच्यातील पहिल्या स्पर्धकाचा खेळ समाप्त झाला, तेव्हा रूना एकटीच फास्टेस्ट फिंगर स्पर्धक होती, अशावेळी तिला अमिताभ यांनी थेट हॉटसीटवर बोलावले. रूना कौन बनेगा करोडपतीच्या इतिहासातील पहिली अशी स्पर्धक आहे, जी फास्टेस्ट फिंगर राऊंड न खेळता हॉटसीटवर पोहचली आहे.

अमिताभच्या समोर हॉटसीटवर बसल्यानंतर रूना खुप आनंदी दिसत होती. कोलकत्ताची 43 वर्षांची रूना एक छोटी इंटरप्रन्योर आहे. तिची 20 वर्षांची मुलगी आहे, जी एमबीबीएस करत आहे. रूनाला आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. शोमध्ये रूनाने चांगला खेळ करत 50 लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत ती पोहचली होती, मात्र तिने 25 लाख रुपयेच जिंकले.

You might also like