Rupali Chakankar | …तर सरपंचपद धोक्यात येणार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची सरकारकडे शिफारस

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – बाल विवाह (Child Marriage) करुन देणारे आणि घेणारे आईवडील, भटजी, फोटोग्राफर, मंगल कार्यालय चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो. मात्र आता ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत बाल विवाह होईल, त्या सरपंचासह (sarpanch) नोंदणी करणाऱ्या रजिस्टारच्या विरोधातही गुन्हा (FIR) दाखल करुन सरपंचाचे पद रद्द करण्याची शिफारस राज्य महिला आयोगाच्या (State Women Commission) वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे. अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आज डोंबिवलीत महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

कल्याण डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या (NCP) महिला पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, माया कटारीया, रेखा सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांनी कल्याण डोंबिवली, भिवंडी, ठाणे ग्राणीण परिसरातील सरकारी रुग्णालयात आरोग्य सेवा योग्य प्रकारे दिली जात नसल्याच्या तक्रारी मांडल्या. यावेळी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या रुग्णालयात सरप्राईज व्हीझीट केली जाईल. तसेच त्यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना सांगून सोयी सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन दिले. महिलांच्या सुरक्षीतेसाठीचे शक्ती विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांसाठी हेल्पलाईन नंबर
राज्यातील पोलीस आयुक्त (CP) आणि अधीक्षकांना (SP) सूचना करण्यात आली आहे की, शहरी भागासाठी 1091 आणि ग्रामीण भागात 112 हा हेल्पलाईन नंबर महिलांसाठी सुरु करण्यात आला आहे. महिलांना कोणताही त्रास असल्यास महिलांनी या क्रमांकावर संपर्क साधावा. दहा ते पंधरा मिनिटात पोलीस त्यांच्या मदतीसाठी येतील.

 

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
ओमायक्रॉन व्हेरियंटचा (Omaicron variant) पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळून आल्याने महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परंतु चाकणकर यांच्या कार्यक्रमात काही महिलांच्या तोंडावर मास्क नव्हता, तसेच सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडल्याचे पहायला मिळाले. याबाबत चाकणकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी काही जणांच्या तोंडावर मास्क नसल्याचे मान्य केले. मात्र, मास्क वापराच्या कडक सूचना देऊ असेही सांगितले.

 

Web Title :- Rupali Chakankar | sarpanch post problem rupali chakankar recommendation Maharashtra government child marriage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Penny Stock | रू. 1.18 चा Stock झाला रू. 78 चा, एका वर्षात 1 लाख रुपये झाले 66 लाख, तुमच्याकडे आहेत का?

Parambir Singh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात ईडीनं नोंदवला परमबीर सिंह यांचा जबाब

Omicron Covid Variant in Pune | चिंताजनक ! पुण्यात ‘ओमायक्रॉन’चा शिरकाव; पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यातील एका रूग्णाला Omicron ची लागण (व्हिडिओ)