रखडलेली ‘मेगाभरती’ आम्ही ‘करु’ ! माजी मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच हसन मुश्रीफांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फडणवीस सरकारच्या काळात राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती राबवण्याची घोषणा करण्यात आली होती. भरती प्रक्रियेचे काम महापरिक्षा पोर्टल या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत होते. या संस्थेने भरती प्रक्रियेत बराच गोंधळ केल्याच्या तक्रारी मागील वर्षात आल्या होत्या. त्यानंतर ही भरती प्रक्रिया रखडली होती परंतु आम्ही भरती प्रक्रिया पुन्हा राबवू अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिली.

एका कार्यक्रमात महिला सरपंचाच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांची राहिलेली मेगाभरती करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. ग्रामसेवकपदांच्या कमतरतेविषयी बोलताना, राज्यातील शासकीय पदांची निर्मिती करुन मेगाभरती करणार असल्याचे उत्तर मुश्रीफ यांनी फडणवीसांसमोर दिले.

एका गावच्या सरपंचाने प्रश्न विचारला की, गावाच्या विकासकामात गावाचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम करतात. परंतु एका गावात एक ग्रामसेवक न देता अनेक गावांत मिळून एक ग्रामसेवक दिला जातो. परंतु ज्याप्रमाणे गावात सरपंच महत्वाचे आहेत तसेच ग्रामसेवक देखील महत्वाचा असतोच. त्यामुळे एक गाव ग्रामसेवक असं करता येणार नाही का?

मुश्रीफ म्हणाले की सध्या कर्माचाऱ्यांची संख्या कमी आहे. मी पदभार स्वीकारुन 4 ते 5 दिवस झालेत परंतु फडणवीसांची मेगाभरती आम्ही करु. या सोहळ्यात फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीवर स्पष्ट उत्तर दिले. त्यावर कामगारमंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली, गुपचूप काही केलं तर त्यातून वाईटच घडतं.

फडणवीस म्हणाले की राज ठाकरेंची आणि माझी अनेकदा बैठक झाली आहे. परंतु मनसे आणि भाजप एकत्र येण्याचे आजतरी कुठलेही चिन्ह नाही. मनसे आणि आमच्या विचारात अंतर आहे. मनसेचे विचार आणि कार्यपद्धत बदलली तर भविष्यत आम्ही विचार करु. परंतु आज तरी ते शक्य वाटत नाही. फडणवीसांच्या या विधानावरुन नवाब मलिक यांनी फडणवीसांना टोमणा लगावला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/