रशियानं पुन्हा एकदा जगाला दिला आश्चर्याचा धक्का ! दूसरी ‘कोरोना’ वॅक्सीन ‘रेडी’, कोणताही साईड इफेक्ट नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियाने सांगितले की, त्यांनी कोरोनाविरुद्धची नवीन वॅक्सीन तयार केली आहे. याआधी 11 ऑगस्टला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले होते की, त्यांनी कोरोनावरील वॅक्सीन शोधली आहे. असं करणारा रशिया पहिला देश बनला होता. रशियाने पहिली लस वापरण्याची परवानगी देखील दिली होती.

आता रशियाने दुसरी लस केल्याचा दावा केला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, रशियाचे म्हणणे आहे की, पहिल्या लसीमुळे होत असलेले साईड इफेक्टस आता दुसऱ्या लसीमुळे होत नाहीत.

रशियाने पहिल्या लसीला ‘स्पुटनिक5’ असे नाव दिले होते तर दुसऱ्या लसीला ‘एपीवॅक कोरोना’ नाव दिले आहे. रशियाने ‘एपीवॅक कोरोना’ ही लस सैबेरियाच्या वर्ल्ड क्लास वायरॉलॉजी इन्स्टिट्युट मध्ये तयार केली आहे. हे इन्स्टिट्युट आधी टॉप सिक्रेट बायॉलॉजिकल वेपन रिसर्च प्लांट होते.

रशियन वैज्ञानिकांच्या मते या दुसऱ्या लसीचे ट्रायल सप्टेंबर मध्ये पूर्ण होईल, पण ज्या व्हॉलेंटीयर्स वर हे ट्रायल केलं गेलं त्यांना कोणतेही साइड इफेक्ट जाणवत नसल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व व्हॉलेंटीयर्स ठीक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘एपीवॅक कोरोना’ या लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत. दोन्ही मध्ये 14 ते 21 दिवसांचे अंतर असेल. अशी आशा आहे की, ऑक्टोबर पर्यंत याचं रजिस्ट्रेशन होईल आणि नोव्हेंबर मध्ये लसीच्या उत्पादनाला सुरुवात होईल.

वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरॉलॉजी अँड बायोटेकॅनॉलॉजी ने कोरोना विषाणूच्या 13 संभावित लसीवर काम केलं होतं. लॅबमध्ये जनावरांवर याची चाचणी करण्यात आली होती. चीन, अमेरिका आणि ब्रिटन देखील कोरोनावरील लसीच्या अंतिम टप्प्यात काम करत आहेत.