Video : ‘त्या’ निर्दयी आईला ‘मनसे’च्या महिलांनी शिकवला धडा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सासू सोबत झालेल्या घरगुती वादातून एका निर्दयी महिलेने तिच्या 6 महिन्याच्या चिमूकल्याला अमानुष मारहाण केली होती. काही दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अखेर नागपूर mns women मनसेच्या महिला mns women पदाधिका-यांनी या महिलेला चांगलाच धडा शिकवला आहे.

 

 

मनसेच्या महिला शहराध्यक्षा मनिषा पापडकर, सचिव स्वाती जैस्वाल, अचला मेसन यांनी या महिलेचा शोध घेऊन तिच्या घरी धडक दिली.

महिलांनी सुरुवातीला त्या निर्दयी आईला बदडल अन् नंतर तिची समस्या जाणून तिला मदतीचा हातही दिला.

मनसेन केलेल्या या कृत्याचे कौतुक होत आहे.

काय आहे प्रकरण

दरम्यान सासुसोबत झालेल्या वादातून एका महिला तिच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण करत होती.

या निरागस जिवाचा आकांत सुरू असताना ती निर्दयी महिला चिमुकल्याला वांरवार गादीवर आपट होती.

त्याला गालावर, तोंडावर,पाठीवर सारखी मारत होती.

हा व्हिडीओ 24 मे रोजी सोशल मीडियावर Social media व्हायरल Viral झाला अन् एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला ताब्यात घेतले.

त्यानंतर डॉक्टराकडून बाळाची तपासणी करून घेतली. रात्र झाल्यामूळे बाळाच्या सुरक्षिततेची हमी घेऊन महिलेला सोडून दिले होते.

Also Read This : 

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

 

Shivrajyabhishek Din : ‘…उत्सुकतेपोटी माझ्या अंगावर तेव्हाही काटा आला होता, आज लिहितानाही येतो’ – जयंत पाटील

 

‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्‍यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या

 

‘आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…’, खा. संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; ‘या’ तारखेला निघणार पहिला मोर्चा (व्हिडीओ)

 

COVID-19 : कोरोनाची ‘सौम्य’ लक्षणे गंभीर संसर्गात बदलण्यापासून रोखण्यासाठी ‘या’ चुका टाळा, जाणून घ्या

 

‘ज्यांना उद्योग नाही ते असे रिकामे मुद्दे उकरुन काढतात’, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

तेलकट त्वचा असेल तर पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी ! जाणून घ्या 5 सोपे घरगुती उपाय