Sachin Tendulkar | ‘या’ देशाच्या कर्णधाराने एका झटक्यात मोडला सचिन तेंडुलकरचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नेदरलँड (Netherland) विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात (ODI match) न्यूझीलंडने (New Zealand) 118 धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने 3 मालिकेत 2 – 0 अशी मालिका जिंकली. या विजयाचा शिल्पकार ठरला न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथम (Tom Latham). विशेष म्हणजे टॉमने वाढदिवसादिवशी (Birthday) सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला (Break Record) आहे. सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) 1998 मध्ये हा विक्रम केला होता. (new zealand captain tom latham break sachin tendulkar record)

 

टॉमने या सामन्यात 123 चेंडूत नाबाद 140 धावांची खेळी केली.
यात 10 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. टॉम आपल्या वाढदिवसादिवशी वनडे क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पाचवा फलंदाज ठरला आहे.
त्याने 30 व्या वाढदिवसादिवशी ही कामगिरी केली आहे.
या शतकासह त्याने वाढदिवसाला सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी असा विक्रम सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) केला आहे.

टॉमच्या आधी भारताच्या विनोद कांबळीने (Vinod Kambli) 18 जानेवारी 1993 रोजी म्हणजेच त्याच्या 21 व्या वाढदिवसादिवशी जयपूरमध्ये (Jaipur) इंग्लंडविरुद्ध (England) शतक केले होते.
यानंतर सचिन तेंडूलकरने आपल्या 25 व्या वाढदिवशी 1998 मध्ये 134 धावा केल्या होत्या.
श्रीलंकेचा (Sri Lanka) विस्फोटक सलामीवीर सनथ जयसूर्याने (Sanath Jayasuriya) 30 जून 2008 मध्ये आपल्या 39 व्या वाढदिवशी 130 धावांची खेळी केली होती.
तर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने (Ross Taylor) 27 व्या वाढदिवशी 8 मार्च 2011 रोजी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध 131 धावा केल्या होत्या.
यानंतर अशी कामगिरी करणारा लॅथम हा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे.
एवढच नाही तर वाढदिवसाला शतक (Century) करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. लॅथमचे वनडेतील हे सहावे शकत आहे.

 

Web Title :- Sachin Tendulkar | nz vs ned 2nd odi new zealand captain tom latham scored 140 runs innings on his birthday and break sachin tendulkar record

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा