Sachin Waze | खंडणी प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याला सीबीआय तपास करत असलेल्या खंडणीच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. बिमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन वाझे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी (दि.29) सत्र न्यायालयाने सचिन वाझे याचा जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाला असला तरी वाझेला तुरुंगातच राहावे लागणार आहे. (Sachin Waze)

व्यापारी विमल अग्रवाल यांनी केलेल्या तक्रारीमध्ये आरोप केला की, कोविड काळात सचिन वाझे आणि काही लोकांनी हॉटेल चालवण्यासाठी खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी दाखल एफआयआरमध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुंड रियाज भाटी, सचिन वाझे, सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांचा समावेश आहे. (Sachin Waze)

पोलिसांनी खंडणी प्रकरणात सचिन वाझे, सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांना अटक केली होती. मात्र, परमबीर सिंग, रियाझ भाडी यांना अटक करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर शुक्रवारी सचिन वाझे याचा दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

सचिन वाझे याच्यावर चार गुन्हे दाखल असून दोन प्रकरणात सीबीआय तपास करत आहे. एका प्रकरणाचा तपास ईडी तर अँटिलिया समोर स्फोटक आणि मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे. सचिन वाझे याला दोन प्रकरणात जामीन मिळाला आहे. तर एका प्रकरणात वाझे माफीचा साक्षीदार आहे. मात्र एनआयए कोर्टाने नुकताच वाझेचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

सचिन वाझे याचा ईडीकडून तपास करण्यात येत असलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.
त्याने सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामीनाचा अर्ज दाखल केला होता.
त्याच्या जामीन अर्जाला ईडीने तीव्र विरोध केला होता. ईडीच्या प्रकरणात सचिन वाझेला 18 नोव्हेंबर 2022 रोजी जामीन मंजुर झाला होता. परंतु, इतर प्रकरणात अटकेत असल्याने तो तुरुंगातच आहे.

100 कोटींच्या खंडणी प्रकरणात माफीचा साक्षीदार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सचिन वाझे
माफीचा साक्षीदार बनला आहे. त्याने जेलमधून सुटका करण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयात केली होती.
मात्र न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावली.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एच.एच. गवलानी यांच्यासमोर वाझेच्या जामीन अर्जावर
एप्रिल महिन्यात सुनावणी झाली होती. अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार
आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचे वाझे याने तपासादरम्यान सांगितले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

Pune Crime News | सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ लाईन बॉय विजय ढुमेचा कोयत्याने सपासप वार करून खून, प्रचंड खळबळ