Sadashiv Peth Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने लुबाडून केली फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sadashiv Peth Pune Crime | एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) एका सराईत गुन्हेगाराने (Criminal On Police Records) बालत्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे (Rape Case Pune). एवढेच नव्हे तर रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे.

याबाबत सदाशिव पेठेत राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन तन्मय नामदेव लोहकरे Tanmay Namdev Lohkare (वय-22 रा. खडकवासला पेट्रोल पंपासमोर, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल आहे. आरोपी तन्मय लोहकरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल आहे. (Sadashiv Peth Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख इन्स्टाग्रामवर झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर आरोपी पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिला घरी बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
आोपीने वेळोवेळी दमदाटी करुन व लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केले.
एवढेच नाही तर पीडित तरुणीकडून रोख 35 हजार रुपये व 81 ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले.
याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे (PSI Ganesh Fartaday) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात
एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली