सद्गुरूंनी काढलेल्या चित्रााला लिलावात 5 कोटींची बोली !

पोलिसनामा ऑनलाईन – अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी काढलेल्या एका चित्राचा ऑनलाइन लिलाव तब्बल 5 कोटी रुपयांमध्ये झाला. जवळपास एक महिन्यापूर्वी हे चित्र त्यांनी ऑनलाइन लिलावासाठी ठेवले होते. अखेर हा लिलाव बंद झाला आणि चित्रावर शेवटची बोली 5.1 कोटी रुपयांची लागली आहे.

लिलावातून मिळालेल्या या पैशांचा वापर इशा फाऊंडेशनच्या विविध सामाजिक कामांसाठी केला जाणार आहे. याआधी जग्गी वासुदेव यांनी काढलेल्या एका चित्राचा लिलाव 4 कोटी रुपयांना झाला. ही रक्कम त्यांनी ‘बीट द व्हायरस’ संस्थेला दान केली होती. या पैशांचा वापर कोरोना व्हायरसविरुद्ध लढणार्‍यांना आवश्यक त्या गोष्टी व ग्रामीण भागातील गरीब लोकांना जेवण पुरवण्यासाठी केला जाणार आहे. जग्गी वासुदेव यांनी इशा फाऊंडेशनच्या ‘भैरव’ नावाच्या बैलाचे चित्र रेखाटले होते. एप्रिल महिन्यात या बैलाचा मृत्यू झाला होता. त्याच्याच आठवणीत त्यांनी हे चित्र रेखाटले होते. गाईचे शेण, कोळसा, हळद, चुना या गोष्टींचा वापर करत हे चित्र रेखाटण्यात आले आहे. सद्गुरुंनी ट्विट करत हे चित्र विकले गेल्याची माहिती दिली.