साध्वी प्राची यांचे पुन्हा वादग्रस्त विधान ! मदरशांमधून लव जिहादचा प्रसार, मुलींना जाळ्यात अडकवण्यासाठी 10 ते 25 लाखांचा निधी

लखनऊ : पोलीसनामा ऑनलाईन – विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी (Vishwa Hindu Parishadr leader Sadhvi Prachi) पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केले आहे. लव जिहाद (love jihad) प्रकरणावरुन त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. मदरशांमधून लव जिहादचा प्रसार केला जात असून यासाठी अरब देशांमधून( Arab countrie) पैसा येत असल्याचा दावा साध्वी प्राची यांनी केला आहे. सरकारने अशा घटनांची चौकशी करून लव जिहाद करणाऱ्यांना फाशी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. साध्वी प्राचीनी केलेल्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

लखनऊमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी साध्वी प्राची यांनी हे विधान केले आहे. मदरशांमधून लव जिहादचा प्रसार केला जात आहे. अरब राष्ट्रांमधून येणाऱ्या पैशामुळे हा प्रकार वाढत आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र जातीमधील मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी 10 ते 25 लाखांचा निधी दिला जात असल्याचा असा दावा त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मंदीरात नमाज पठनाचा एक प्रकार घडला होता. साध्वी प्राची यांनी हा प्रकार षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

भडकाऊ वक्तव्य टाळावे, महंत नरेंद्र गिरी यांचा सल्ला
देशात भाईचारा गँग सक्रिय आहे, त्यांना मी इतकच सांगू इच्छिते की देशात एकता कायम राहावी यासाठी मी मशिदीत हवन करू इच्छिते असे साध्वी प्राची यांनी म्हटले आहे. साध्वी प्राची यांच्या या विधानावर देशातील संतांची सर्वात मोठी परिषद असलेल्या आखाडा परिषदेने प्रतिक्रिया दिली आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी साध्वी प्राची यांनी भडकाऊ वक्तव्य करणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दहशतवादी मदरशांमध्येच वाढले आहेत, भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान
मध्य प्रदेश सरकारच्या कॅबिनेट मंत्री उषा ठाकूर (Cabinet Minister Usha Thakur) यांनी काही दिवसांपूर्वी मदरशांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. दहशतवादी हे मदरशांमध्येच वाढले आहेत असे भाजपाच्या उषा ठाकूर यांनी म्हटले होते. सर्व कट्टरवादी व सर्व दहशतवादी मदरशांमध्ये शिकले व वाढले आहेत. जम्मू-काश्मीरला दहशतवादाचा कारखाना बनवून सोडले होते. असे मदरसे जे राष्ट्रवादाशी समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जाऊ शकत नाहीत, त्यांना आपल्याला योग्य शिक्षणाशी जोडून समाजाच्या प्रगतीसाठी पुढे आणले गेले पाहिजे. आसामने हे करून देखील दाखवले आहे. आसामध्ये मदरसे बंद आहेत. राष्ट्रवादामध्ये जे अडचण निर्माण करत असतील अशा सर्व गोष्टी राष्ट्रहितासाठी बंद झाल्या पाहिजेत. शासकीय मदत बंद झाली पाहिजे, असे ठाकूर यांनी म्हटले होते.