‘भाईजान’ सलमान खान ‘जीजू’साठी प्रवीण तरडेंच्या ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलवूड स्टार सलमान खाननं अनेक कलाकारांना इंडस्ट्रीत लाँच केलं आहे. आयुष शर्मा त्यापैकीच एक आहे. सलमाननं आयुषला लव यात्री या सिनेमातून लाँच केलं होतं. परंतु हा सिनेमा सपशेल फ्लॉप झाला. यानंतर अनेकांनी असे अंदाज लावले ही सलमान खान आता आयुषला आपल्या सिनेमात घेणार नाही. सलमाननं सर्वांचा हा अंदाज खोटा ठरवला आहे.

अशी माहिती आहे की, सलमान खान लवकरच आपला जीजू आयुष शर्माला घेऊन एक सिनेमा करणार आहे. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, सलमान खान 2018 साली आलेल्या मुळशी पॅटर्न या मराठी सिनेमाचा रिमेक करणार आहे. हा सिनेमा तेव्हाचा हिट सिनेमा आहे. लवकरच याचा रिमेक तयार केला जाणार आहे.

राधे सिनेमानंतर या सिनेमावर काम सुरू केलं जाणार आहे. असंही समजत आहे की, सलमान खान एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. स्टोरी आयुष शर्माच्या भोवती फिरणार आहे तर सलमान खान सपोर्टींग रोल साकारणार आहे. मुळशी पॅटर्न हा सिनेमा प्रविण तरडेनं डायरेक्ट केला होता आणि त्यांनी लिहिला होता.

मुळशी पॅटर्नच्या या रिमेक सिनेमात आयुष शर्मा एका गँगस्टरचा रोल साकारणार आहे. अद्याप सिनेमाच्या नावाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक होणार असल्याचं समजल्यानंतर डायरेक्टर प्रविण तरडे हेदेखील खुश आहेत.

View this post on Instagram

3 on holiday .. 1 in spirit

A post shared by Aayush Sharma (@aaysharma) on

 

You might also like