Samriddhi Highway Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ ठार; 22 जण जखमी, सैलानी भाविकांवर काळाचा घाला!

संभाजी नगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात (Samriddhi Highway Accident) झाला आहे. छत्रपती संभाजी नगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) हद्दीत वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. तर 20 ते 22 जण जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्स बस भाविकांना घेऊन सैलानी येथील दर्गावर निघाली होती. यात काही लहान बालकांचा देखील समावेश आहे. मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास हा अपघात (Samriddhi Highway Accident) झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू करण्यात आले.

ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन नाशिककडे परतत होते. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून भीषण धडक दिली. ट्रॅव्हल्स बसमध्ये एकुण ३० जण होते, अपघातात १२ जण ठार झाले असून यामध्ये काही लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे. हे भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समजते. (Samriddhi Highway Accident)

अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ, बचाव पथक, वैजापूर पोलीस यांनी मदतकार्य सुरू केले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | बाबा भिडे पुल होणार 2 महिन्यांसाठी बंद; ‘या’ पर्यायी मार्गाचा करावा वापर

Ajit Pawar | “कोणतीही चुकीची कामं खपवून घेतली जाणार नाहीत” आढावा बैठकीमध्ये अजित पवारांचे आदेश