भारतामध्ये ‘लाँच’ होण्यापूर्वीच समोर आली सॅमसंग ‘Galaxy Note 10 Lite’ ची ‘किंमत’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सॅमसंग गॅलेक्सि नोट 10 लाईट हा प्रसिद्ध फ्लॅगशिप स्मार्टफोनचे बजेट व्हर्जन असणार आहे. वन प्लसच्या मानाने या मोबाइलची किंमत खूप परवडेबल असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील 6 GB रॅम असलेल्या फोनची किंमत 35,990 रुपये आणि 8 GB रॅम असल्याची किंमत 39,990 रुपये असेल.

हा नवीन रिपोर्ट जुन्या रिपोर्टपेक्षा वेगळा आहे, असा दावा केला जात आहे की नोट 10 लाइटची किंमत सुमारे 50,000 रुपये असेल. आठवण म्हणून, हा स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीस गॅलेक्सी एस 10 लाइटसह लॉन्च करण्यात आला होता. गॅलेक्सी नोट 10 लाइट आणि गॅलेक्सी एस 10 लाइट हे दोन्ही येत्या आठवड्यात लॉन्च केले जाऊ शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे.

Samsung Galaxy Note 10 Lite चे स्पेसिफिकेशन
या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच-होल कटआउट आणि एफएचडी + रेझोल्यूशनसह 6.7 इंचाचा सुपर एमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा हँडसेट Android 10 आधारित वन UI 2.0 वर चालतो. याची बॅटरी 4,500mAh आहे. या फोनमध्ये 2018 फ्लॅगशिप प्रोसेसर एक्सिनोस 9810 असून 6 जीबी / 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ ले सपोर्टसह एस पेन देखील देण्यात आले आहे.

फोटो साठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. या सेटपमध्ये ड्युअल पिक्सल तंत्रज्ञानासोबत 12 MP वाईड अँगल कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड एंगल कैमरा आणि 12 MP टेलीफोटो कैमरा देण्यात आलेला आहे. सेल्फीसाठी या स्मार्ट फोनमध्ये 32 MP चा कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/