खुशखबर ! 32 इंची Smart TV भारतात लॉन्च, किंमत फक्त 5999 रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – Samy Informatics ही एक भारतीय कंपनी आहे. ज्यांनी दावा केला आहे की ते सर्वात स्वस्त टीव्ही विकतात. याआधी कंपनीने स्मार्ट टीव्ही लॉन्च केला आहे आणि आता कंपनीने सांंगितले आहे की ते Tuffen ग्लाससह स्मार्ट टीव्ही लॉन्च करणार आहेत. हा स्मार्ट टीव्ही Android वर चालतो आणि 32 इंच आहे. या कंपनीचा टीव्ही फक्त ऑनलाइन खरेदी केला जातो ज्याची किंमत 5,499 रुपये आहे.

कंपनी हे टीव्ही एका वेगळ्या प्रकारे विकते, याची वेबसाइट तर आहे परंतू हे ओपन केल्यानंतर वस्तू अ‍ॅपवर रिडायरेक्ट करण्यात येते. हे खरेदी करण्यासाठी अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. यानंतर आधार नंबर टाकावा लागतो आणि त्यानंतर याची खरेदी करता येते.

Samy नावाच्या या स्टार्ट अपच्या मते कंपनी टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातूनवरुन पैसे कमावते कारण टीव्ही सूरु केल्यानंतर यूजरला जाहिरात दिसते. तसेच याला स्किप देखील केले जाऊन शकते. आधारकार्डच्या आवश्यकतेवरुन कंपनीने सांगितले की त्यांना लक्षात आले की लोक टीव्ही स्वस्त असल्याने टीव्हीचे पार्ट डिस्मेंटल करुन वेगवेगळे विकतात.

कंपनीच्या डायरेक्टरच्या मते आधार नंबर आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला डिटेल्स दाखल करावे लागतात आणि तेव्हाच तुम्ही खरेदी करु शकतात. दिल्लीच्या Constitution Club मध्ये हा टीव्ही लॉन्च करण्यात आला. कंपनीने दावा केला की हे टीव्ही भारतात बनवण्यात आले आहेत. किंमत भले की 5499 रुपये आहे परंतू तुम्हाला खरेदी करताना जीएसटी आणि शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा द्यावे लागतात.
कंपनीने सांगितले की टीव्ही मजबूत बनवण्यात आली आहे जेणे करुन ग्लास तूटणार नाही. यासाठी Toughen ग्लास यूज करण्यात आला आहे, यात पेन ड्राईव्ह लावण्यासाठी स्लॉट देखील देण्यात आला आहे.

कंपनीने सांगितले की हा कोणताही स्कॅम, रिंगिंग बेल्स सारखा फ्रिडम 251 फ्रॉड नाही. ते हे टीव्ही 2 वर्षापासून टीव्ही विकत आहेत आणि ज्या ग्राहकांना कंपनीने टीव्ही विकले आहे ज्याचे फोटो सोशल मिडियावर देखील अपलोड करण्यात येतात.

Visit : Policenama.com