‘SEX’ पावर वाढवण्यासाठी वापरला जाणारा 3 कोटींचा साप विकणारा जाळ्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका व्यक्तीनं दुर्मिळ प्रजातीच्या सापाची तब्बल 3 कोटींना विक्री केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. जय प्रकाश शर्मा असं या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सर्वात दुर्मिळ असा सँड बोआ नावाचा साप जप्त केला आहे. या सापाचा वापर लैंगिक शक्तीत वृद्धी, कर्करोगाच्या आजाराच्या उपचारासाठी, महागडे परफ्युम आणि अंमली पदार्थ म्हणून केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाची किंमत 3 कोटींहून अधिक आहे.

असे पडले ‘या’ सापाचे नाव
वाळूखाली लपून रहात असल्यानं या सापाला सँड बोआ नाव पडलं आहे. अ‍ॅनाकोंडा प्रमाणे या सापाचेही डोळे त्याच्या डोक्यावर असतात. याला पकडणं म्हणजे खूपच अवघड बाब. आहे. हा साप वाळूखाली अशा प्रकारे लपतो की, कळून येत नाही. पूर्ण शरीर वाळूखाली आणि फक्त डोकंच वर असतं त्यामुळं त्याला शिकार करणं खूपच सोपं जातं. काही लोक हा साप पाळतात असेही समजत आहे. हा साप शिकार टप्प्यात येईपर्यंत अजिबात हालचालही करत नाही त्यामुळे सावजाला जराही याच्या अस्तित्वाचा अंदाज येत नाही.

सेक्स पावरसाठी हा साप गुणकारी
या सापाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. कारण या हा साप इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच पुरुषाच्या लिंगाला उत्तेजना न येण्याच्या समस्येवर गुणकारी मानला जातो. या सापाच्या त्वचेचा वापर सौंदर्यप्रसाधने आणि पर्स हँडबॅग तसेच जॅकेट आदी बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय सांधेदुखी आणि शारीरिक व्याधींवरही हा साप गुणकारी आहे असं मानलं जातं.

कोठे आढळतो सँड बोआ ?
या सापाच्या प्रजाती विविध प्रदेशात दिसतात. उत्तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर या सापाची एक प्रजाती आढळून येते. या सापाची एक प्रजाती प्रामुख्यानं भारत आणि आफ्रिकेतही आढळून येते.

सँड बोआ विषयी थोडक्यात…
इतर सापांप्रमाणे सँड बोआ देखील मांसाहारी असतो. शिकार जिथे असेल तिथे हे साप राहतात. सँज बोआ साप हा उंदीर, बेडूक, ससे, सरडे अशा प्राण्यांची शिकार करून खातो.

Visit : Policenama.com
उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे