Sandeep Deshpande | 27 नोव्हेंबरला सर्वाचा हिशेब होणार; मसनेच्या संदीप देशपांडेंचे ट्वीट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी शिवसेनेची (Shivsena) स्थापना करुन मराठी माणसांच्या आवाजासाठी एक चळवळ सुरु केली होती. ती चळवळ आता संपून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची वळवळ राहिली आहे, असे मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. तसेच संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ‘27 नोव्हेंबरला सर्वांचा हिशेब होणार’ असे ट्वीट देखील केले आहे.

 

संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी यावेळी मनसेच्या आगामी मेळाव्याची माहिती दिली. 27 नोव्हेंबर रोजी नेस्कोला दुपारी 4 वाजता गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सर्व गटाध्यक्षांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे येत्या 27 तारखेला महाराष्ट्रातील राजकारणाच्या गढूळ पाण्यावर तुरटी फिरविण्याचे काम राज ठाकरे करणार आहेत. प्रत्येकाचा हिशेब 27 तारखेला होणार आहे, असे संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.

मुंबईच्या आगामी महानगरपालिका निवडणुका, राज्यातील पेटलेले राजकारण आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सावरकरांवरील वादग्रस्त टीका आदी मुद्दे राज ठाकरेंचा विषय असू शकतो.
तसेच मनसे आणि भाजपचे सूत देखील जुळू लागल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीला रोखण्यासाठी मनसे भाजपची साथ देणार का, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे राज ठाकरेंची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेला महाराष्ट्रात रोखण्याची भाषा देखील मनसेने केली होती.
त्यामुळे भाजपने मनसेचा वापर चांगला करुन घेतला, असे अनेकांचे मत आहे.
त्यावर ठाकरे काही बोलणार का, याकडे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Web Title :- Sandeep Deshpande | mns meeting will be held on november 27 and raj thackeray will guide the office bearers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss 16 | सुम्बुल तौकीर खानच्या वडिलांनी तिला दिलेल्या सल्ल्याची सर्वत्र चर्चा; जाणून घ्या नक्की काय म्हणाले…

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनने वाढदिवशी शेअर केली ‘हि’ खास पोस्ट; पोस्ट व्हायरल

PM Narendra Modi | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पीएम नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट, ‘त्या’ ऑडिओ मेसेजनं प्रचंड खळबळ