Sandipan Bhumre On Chandrakant Khaire | ‘…तर 500 एकर जमीन खैरेंना देईन’, खैरेंच्या आरोपांना संदीपान भुमरेंचे प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Sandipan Bhumre On Chandrakant Khaire | मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीवरुन (Lok Sabha Elections) शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटातील (Thackeray Group) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप (Maharashtra Politics News) सुरु आहेत. ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former MP Chandrakant Khaire) यांनी शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Maharashtra Minister Sandipan Bhumre) यांच्यावर आरोप केले आहेत. भुमरेंनी 700 एकर जमीन कुठून आणली? असा सवाल खैरे यांनी उपस्थित केला आहे. यावर भुमरे यांनी माझ्याकडे 700 एकर जमीन सापडली तर 500 एकर खैरेंना देणार असं म्हटलं आहे. (Sandipan Bhumre On Chandrakant Khaire)

 

काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?

संदीपान भुमरेंकडे वडिलांची फक्त चार एकर जमीन होती. नंतर 25 एकर झाली. आता 700 ते 800 एकर जमीन झाली म्हणतात. ही जमीन कुठून आणि कशी आली? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी संदीपान भुमरेंना विचारला आहे. यावर भुमरेंनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. (Sandipan Bhumre On Chandrakant Khaire)

 

मी दुरड्या विकून…

चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना संदीपान भुमरे म्हणाले, माझ्या वडिलांचा सातबारा उतारा दाखवतो. राजकारणात येण्यापूर्वी वडिलोपार्जित बागायती आणि कोरडवाहू सुद्धा जमीन होती. मी दुरड्या विकून राजकारण केलं नाही. खैरैंना मी धडा शिकवणार आहे. खैरेंनी निवडणुकीला निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान त्यांनी दिलं. तसेच माझ्याकडे 700 एकर जमीन सापडली, तर मला 200 एकर ठेवावी, बाकीची 500 एकर जमीन चंद्रकांत खैरे यांना द्यावी, असंही भुमरे म्हणाले.

 

त्या खात्याला नावारुपास आणलं

मंत्रीमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) पाच मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असून यामध्ये संदीपान भुमरे यांचेही नाव आहे.
यावर बोलताना भुमरे म्हणाले, या बातम्या विरोधकांनी पेरल्या आहेत. यात कोणताही अर्थ नाही.
कारण, सर्व मंत्री आपल्या खात्याचं काम करतात. आमच्यावर वरिष्ठांच्या नाराजीचं कारण काय? ज्या खात्याला कोणी ओळखत नव्हतं,
त्याला नावारुपास आणलं. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी रोजगार हमी खात्याचं कौतुक केल्याचे भुमरे यांनी सांगितलं.

 

Web Title :  Sandipan Bhumre On Chandrakant Khaire | …So I will give 500 acres of land to Khaire,’
Sandeep Bhumre’s response to Khaire’s allegations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा