सांगली : मद्यपीची पोलिसांवर अरेरावी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

गोकूळनगर परिसरात एकाने दारुच्या नशेत पोलिसांना शिविगाळ करीत  हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अमरदीप विठ्ठल हजारे (वय 28, रा. शिरुर, ता. अथणी) याला अटक केली असून त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान  पोलिसांनी त्याच्याकडील जीप (क्र. एम. एच. 4, डी.आर. 6812) आणि  कोयता जप्त केला. पोलिसांनी सांगितले की, विश्रामबाग पोलिस ठाण्यातील हवालदार सचिन शिवाजी पवार आणि त्यांचे सहकारी बुधवारी रात्री गोकूळनगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी हजारे हा तेथे नशेत अढळून आला. याच्याकडे चौकशी केली असता त्याने मी आर्मीत असल्याचे सांगितले.
[amazon_link asins=’B079V4L9BD,B00N78RZO6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f0ce9318-b770-11e8-882e-b5f8edd3a140′]

त्याच्याकडे हवालदार पवार यांनी ओळखपत्र मागितले असता, तू मला ओळखपत्र मागणारा कोण असे म्हणत शिविगाळ करण्यास सरूवात केली. पवार यांच्या अंगावर जावू लागला असता इतर पोलिसांनी हजारे यास पकडून ठेवले. पोलिस उपाधीक्षक अशोक विरकर त्या ठिकाणी आले असता त्यांनाही हजारे याने उद्धट उत्तरे दिली. त्यानंतर हजारेच्या जीपची झडती घेतली असता पोलिसांना कोयता मिळाला. त्यानंतर हजारे याला ताब्यात घेऊन अटक केली.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी