Sangita Kanaujia Passed Away | दुर्देवी ! अपघातात गंभीर झालेल्या उपजिल्हाधिकारी संगिता कनौजियांचे निधन, रुग्णलयात घेतला अखेरचा श्वास

ऋषिकेश : वृत्तसंस्था – Sangita Kanaujia Passed Away | उत्तर प्रदेशच्या लक्सर (Luxor Uttar Pradesh) येथील रुडकी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात (Terrible Accident) उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) संगिता कनौजिया गंभीर जखमी झाल्या होत्या. हा अपघात 26 एप्रिल रोजी झाला होता. या अपघातात त्यांच्या गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर संगीता या गंभीर जखमी झाल्या होत्या. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला होते. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी (दि.8) त्यांचे (Sangita Kanaujia Passed Away) निधन झाले.

 

हरीद्वार जिल्ह्यातील (Haridwar District) लक्सर येथे संगीता कनौजिया उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. 26 एप्रिल रोजी त्यांच्या गाडीला धडक बसून भीषण अपघात झाला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संगीता यांच्यावर मागील पाच महिन्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज आज संपली. संगीता कनौजिया यांनी आज रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

 

ऋषिकेशचे उपजिल्हाधिकारी शैलेंद्र सिंह नेगी (Shailendra Singh Negi) यांनी संगीता कनौजिया यांच्या निधनाची माहिती दिली.
अपघात झाल्यानंतर संगीता यांना रुडकी येथील विनय विशाल नर्सिंग होममध्ये तात्काळ दाखल करण्यात आले होते.
मात्र त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले.
मात्र, रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

 

Web Title :- Sangita Kanaujia Passed Away | deputy collector sangita kanaujia passed away in case of accident breathed her last in hospital

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cardiac Arrest | माता पार्वती बनून नाचणार्‍या व्यक्तीला आला हार्ट अटॅक… स्टेजवरच मृत्यू, Video

 

Nashik ACB Trap | 3000 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

NEET Exam Result | नीट परीक्षेत दुसऱ्यांदा कमी मार्क मिळाले, रोहिणीने जीवनयात्रा संपवली