सांगली : ग्रुपच्या वर्चस्ववादातून चाकू हल्लाप्रकरणात पाचजणांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

मिरज तालुक्यातील बुधगाव येथे मंगळवारी सकाळी दोन ग्रुपच्या वर्चस्ववादातून प्रतीक पाटील या युवकावर चाकू हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी सातजणांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. तर दोनजण अद्याप फरार आहेत.

अजिंक्य कुमार इंगळे (वय 21, रा. माळभाग), गणेश बाबू यमगर (वय 19, रा. लक्ष्मीनगर), साहिल मुस्तफा शिकलगार (वय 19, रा. महादेव मंदिराजवळ), प्रशांत हणमंत कोळी (वय 19, रा. जोतिबानगर, सर्व रा. बुधगाव), रोहित भगत थोरात (वय 18, रा. भगत गल्ली, माधवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील प्रशांत कोळी याची पोलिस कोठडी शनिवारी संपत आहे. तर अन्य संशयितांना शुक्रवारी (दि.२७) अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर अभिषेक देसाई, गौरव कोळी यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. याप्रकऱणी प्रतीक पाटीलने फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B0711T2L8G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2679339f-91b7-11e8-99cc-5d12b58dc5a1′]
बुधगावमध्ये अजिंक्य दादा ग्रुप आणि पाटील ग्रुप असे दोन ग्रुप आहेत. या दोन्ही ग्रुपमध्ये वर्चस्वावरून वाद आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास बुधगावमधील जोतीबानगर येथे अजिंक्य ग्रुपच्या मुलांशी पाटील ग्रुपच्या मुलांचा वाद सुरू होता. त्यावेळी प्रतीक तेथे मित्रांसमवेत गेला होता. प्रतीक भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर संशयितांनी त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर अभिषेक देसाईने त्याच्यावर चाकूहल्ला केला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी सातजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप दोघांना अटक करण्यात आलेली नाही.