पावसाचा जोर ओसरल्यामुळे कृष्णेची पाणी पातळी 23 फुटावर स्थिर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पाऊस कमी झाल्याने सांगलीत कृष्णा नदी तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळी कमी झाली आहे. चांदोली धरणातील विसर्गामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढली आहे. तर कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळची पाणी पातळी 23 फुटावर स्थिर आहे. कोयना धरणात 63 टीएमसी इतका पाणी साठा आहे. धरण परिचलन सूचीनुसार कोयना धरणातील पाणीसाठा 80 टीएमसीवर गेल्यीनंतरच कोयना धरणातून कोयना नदीमध्ये पुराचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.

दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस व पाण्याची आवक कमी झाली आहे अशी माहिती कोयना सिंचन विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी होत आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे 4400 क्युसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदीकाठावरील गावे व नागरिकांना सकर्त राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

महापूराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा खबरदारी घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महापूर बांधित जिल्ह्यात कोरोनाबरोबरच आपत्ती व्यवस्थापनला महत्व दिलेले आहे. सांगली जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम सांगली जिल्ह्यात दाखल झालेल्या आहेत. त्यातील एक टीम सांगली शहरात तर दुसरी टीम आष्टा ( ता. वाळवा) येथे तैनात ठेवलेली आहे.