सांगवी पोलिसात ‘बूट’चोरीला गेल्याची तक्रार; चोर सीसीटीव्हीत कैद!

पिंपरी: पोलीसनामा आॅनलाइन

पिंपरी-चिंचवड परिसरातील पिंपळे गुरव येथे घराच्या समोरील कपाटात असलेले ब्रॅंडेड बूट चोरीला गेल्याची तक्रार सांगवी पोलिसात दाखल झाली आहे. बूटचोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरणी विद्या समाधान कदम वय-३२ या महिलेने सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे. महिलेचे वडील हे पोलिसात कार्यरत असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु आता पोलिसांसमोर बूट चोरणाऱ्या चोराला पकडण्याचे आवाहन आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विद्या समाधान कदम वय-३२ रा.सहकार नगर पिंपळे गुरव येथे राहतात. याच घराच्या समोरील बंद असलेल्या लाकडी कपाटातून 2850 रुपयांचे ब्रॅडेड शूज चोराने लंपास केले आहेत. हा सर्व प्रकार सिसिटीव्हीत कैद झाला असून सांगवी पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. परंतु मोठे चोर, बदमाश असताना पोलिसांसमोर मात्र किरकोळ शूज चोरणाऱ्या चोराचे आवाहन असणार आहे. जुन्या शूज ला चोरबाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी असते, यातून पैसे देखील बरे मिळतात. त्यामुळेच काही तरुण शूज चोरत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.