IPL 2019 : क्रिकेटच्या मैदानावर टेनिसस्टार ‘सानिया मिर्झा’चा नवा लूक

हैदराबाद : वृत्तसंस्था – भारतात सध्या निवडणुकींसोबत आयपीएलचा ज्वर देखील चढला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांच्या नजरा खेळावर आणि तेथील स्टार्सवरही असतात. आज हैदराबादमध्ये झालेल्या आयपीएलच्या मैदानात टेनिस खेळाडू सानिया मिर्झाचा नवीन लूक चाहत्यांना पाहायला मिळाला. सानिया चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना पाहण्यासाठी आली होती. दोन्ही संघामधून सानिया हैदराबादला सपोर्ट करत होती.

मागील काही दिवसांपासून सानिया भारतात आहे की नाही हेही कोणाला समजत नव्हते. तिच्या डिलेव्हरीनंतर सानिया जनू गायब झाली होती. आज मात्र हैदराबादला सपोर्ट करताना सानियाचा नवा लूक आणि बिनधास्त अंदाज पाहायला मिळाला. हैदराबादला सपोर्ट करतानाचा तिचा फोटो आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर हँडलरवरून टाकण्यात आला आहे. तसंच या फोटोला पहा कोण सपोर्ट करत आहे, असं लिहीत सानियाचा हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने फलंदाजीला सरुवात ७९ धावांची सलामी देत झाली. मात्र शेन वॉटसन बाद झाला. त्यानंतर संघाला उतरती कळा लागली. सलामीला वॉटसनने २९ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या तर फॅक प्लेसिसने ३१ चेंडूत ४५ धावा केल्या. मात्र त्यानंतर संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे हैदराबादसमोर फक्त १३२ धावांचे आव्हान चेन्नई देऊ शकली. त्यावर हैदराबादने जोरदार खेळी करत चेन्नईची विजयी घोडदौड रोखली.

You might also like