संजय राऊत शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित, राजकीय चर्चेला ‘उधाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती मात्र आज झालेल्या मंत्र्यांच्या शपतविधी सोहळ्यासाठी संजय राऊत अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

राज्यात आज 36 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे देखील कॅबिनेटमध्ये सहभागी झाले आहेत. तसेच आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्री कार्यालयाच्या विभागाची (सीएमओ) जबाबदारी उद्धव ठाकरे सोपावू शकतात. मात्र आज झालेल्या शपत विधीनंतर अनेक नाराजांनी आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

ऐन वेळेवर संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांचे नाव मंत्रीमंडळ यादीतून वगळून त्या जागी आदित्य ठाकरे यांचे नाव मंत्रीमंडळात समाविष्ठ करण्यात आल्याने सुनील राऊत हे नाराज आहेत आणि राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची महिती मराठी वृत्तवाहिनीने दिली होती आणि याच नाराजीमुळे संजय राऊत देखील सोहळ्यासाठी उपस्थित न राहिल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न विरोधक उपस्थित करत होते. परंतु आज अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यात अजित पवार यांच्याच गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समर्थकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/