Sanjay Raut : विरोधक सत्ताधाऱ्यांना भेटू शकतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान राजकारणात अनेक चर्चा रंगु लागल्या आहेत. यावरून आता शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, काही कामानिमित्त विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची भेट घेतल्यास त्यात चुकीचं काय आहे? असा सवाल करत, विरोधक सत्ताधाऱ्यांना भेटू शकतात. तर महाविकास आघाडीला धोका नाही, महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने काम करत आहे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. त्यावेळी त्‍यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधला.

संजय राऊत बोलताना म्हणाले, देशपातळीवर महाराष्ट्राची मोठी प्रतिष्ठा आहे. विरोधकांना चुकीची वातावरण निर्मिती करण्याची संधी देता कामा नये. यामुळे राज्याची बदनामी होते, वाईट वाटते. पण, गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपापल्या पदावर योग्य काम करत आहेत. गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी झाली, ही सर्वांचीचं भावना आहे, असेही त्यावेळी राऊत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांची भेट शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमधील एका फार्म हाऊसमध्ये घेतली अशी बातमी एका गुजराती दैनिकाने दिल्याने, राजकारणात अनेक चर्चेला उधाण आले. या गुप्त भेटीनंतर शहा दिल्लीमध्ये दाखल झाले. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना ‘सर्व काही सांगायचे नसते’ असे सांगत अनिश्चितमुळे वाटणारी चिंता वाढवली होती. गुप्त भेट आणि शहा यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत चर्चा रंगल्या आहेत.