Sanjay Raut On CM Eknath Shinde | राऊत आले नाहीत का? मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील खोचक सवालावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

छत्रपती संभाजी नगर : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On CM Eknath Shinde | छत्रपती संभाजी नगरमधील मंत्रिमंडळ बैठकीसाठी (Marathwada Cabinet Meeting) कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी मी बैठकीनंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला पत्रकार म्हणून जाणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. पण ते आज गेले नाहीत. त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी, राऊत आले नाहीत का?, असा खोचक सवाल केला. यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut On CM Eknath Shinde)

राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्या मनात थोडी धाकधूक होतीच. खरोखरच येणार नाहीत ना? शेवटी भुताटकी आहे. येऊन कोणाच्या मानेवर बसणार नाहीत ना? पण, पत्रकार परिषद झाली. मुख्यमंत्र्यांनी घोषणांचा पाऊस पाडला. नेहमीप्रमाणे आरोप करण्यात आले. संभाजीनगर आणि मराठवाड्याला फक्त घोषणाच मिळाल्या. (Sanjay Raut On CM Eknath Shinde)

राऊत पुढे म्हणाले, मी पत्रकार परिषदेला येत असल्याने निर्बंध आणण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला फोटो असलेले पास देण्यात येत नाहीत. मात्र, मी येत असल्याने फोटोचे पास देण्यात आले. एवढी भीती मनात बाळगू नये. मी कार्यालयात बसल्यावर साध्या वेशातील पोलीस बाहेर उभे होते. मला तसेच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांना पोलिसांचे फोन आले, अशी माहिती राऊत यांनी दिली.

काय म्हणाले होते संजय राऊत
संजय राऊत म्हणाले होते, मंत्रिमंडळ बैठकीसाठी कलेक्टरने शहरातील सर्व हॉटेल बुक केली आहेत. कोणासाठी खर्च केला याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. शनिवारी मंत्रिमंडळ बैठक आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल. त्याला एक पत्रकार म्हणून मी जाणार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमात पैसे उधळले जात आहेत, याचा हिशेब सरकारला द्यावा लागेल. राऊतांच्या इशाऱ्यानंतर ते खरंच मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाऊन जाब विचारणार का? अशी चर्चा दिवसभर रंगली होती.

दरम्यान, आज राज्य मंत्रिमडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी, राऊत आले नाहीत का? असा खोचक सवाल पत्रकारांना विचारताच उपस्थितांनी हसून दाद दिली. यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे यांनी दुसऱ्या एका मराठी वृत्तवाहिनीच्या राऊत नावाच्या पत्रकाराचा उल्लेख करत आपण त्यांच्याबद्दल विचारत असल्याचे म्हटले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेसाठी खासदार संजय राऊत यांना देखील पास देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यामुळे संजय राऊत हे खरंच मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis On Sunil Kendrekars Farmer Suicides Reports | शेतकरी आत्महत्यांबद्दल
केंद्रेकर यांच्या अहवालावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘त्यांची सामिती…’

Ganeshotsav 2023 | मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन –
पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Ajit Pawar On Maharashtra Govt Ministers | अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावले खडेबोल,
कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची, मंत्रिपदे नुसती…

Tuljapur Tuljabhavani Temple-Pilgrimage Tourism | तुळजाभवानी मंदिरासाठी 1328 कोटींचा निधी;
मराठवाडा तिर्थक्षेत्र विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठे पॅकेज जाहीर!

Pune Ganeshotsav 2023- Fire Brigade | पुणे शहरात गणपती उत्सवानिमित्त अग्निशमन दल घेणार
“अग्निसुरक्षित गणेश मंडळ” आढावा; मंडंळाना नोंदणी करण्याचे आवाहन

शहराचा सातत्यपूर्ण अभ्यास करण्यासाठी महापालिका गोखले इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ‘अर्बन ऑब्झर्वेटरी’
स्थापन करणार : महापालिका आयुक्त विक्रम कुमार