Tuljapur Tuljabhavani Temple-Pilgrimage Tourism | तुळजाभवानी मंदिरासाठी 1328 कोटींचा निधी; मराठवाडा तिर्थक्षेत्र विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठे पॅकेज जाहीर!

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन –Tuljapur Tuljabhavani Temple-Pilgrimage Tourism | येथे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठवाड्यासाठी अनेक विकासकामांची घोषणा केली तसेच यासाठी ४५ हजार कोटीचा निधी जाहीर केला. तसेच, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी तब्बल १३२८ कोटी रुपयांचा विकास आराखडा सुद्धा या बैठकीत मंजूर केला. (Tuljapur Tuljabhavani Temple-Pilgrimage Tourism)

धार्मिक पर्यंटन तिर्थक्षेत्र विकास निधी

धार्मिक पर्यंटनासाठी तिर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत प्रसिद्ध मंदिरांचा विकास करण्यात येत आहे. या अंतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी तब्बल १३२८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला. (Tuljapur Tuljabhavani Temple-Pilgrimage Tourism)

तसेच घृष्णेश्वर मंदिरासाठी १५६ कोटी, औंढा-नागनाथ मंदिरासाठी ६० कोटी, उदगीर येथील बाबांच्या समाधीस्थळासाठी १ कोटी, परळी तिर्थक्षेत्र २४० कोटी, महादेव मंदिर विकाससाठी १४५ कोटी, अशा अनेक तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, या विकासकामांमुळे मराठवाड्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांचा विकास होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली आहे. यामुळे ८ लाख हेक्टर जमिन ओलिताखाली येईल. यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. यानंतर विविध प्रकल्पांसाठी ४५ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण साठ हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis On Sunil Kendrekars Farmer Suicides Reports | शेतकरी आत्महत्यांबद्दल
केंद्रेकर यांच्या अहवालावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘त्यांची सामिती…’

Ganeshotsav 2023 | मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन –
पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Ajit Pawar On Maharashtra Govt Ministers | अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावले खडेबोल,
कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची, मंत्रिपदे नुसती…

Pune Ganeshotsav 2023- Fire Brigade | पुणे शहरात गणपती उत्सवानिमित्त अग्निशमन दल घेणार
“अग्निसुरक्षित गणेश मंडळ” आढावा; मंडंळाना नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे: पहाटेच्या वेळी शंकरशेठ रोडवर कारचालकाला जबरदस्तीने लुटणार्‍या टोळीला
खडक पोलिसांकडून 24 तासात अटक