Sanjay Raut On Devendra Fadnavis | संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाले – ‘या देशासाठी तुमचं योगदान काय?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sanjay Raut On Devendra Fadnavis | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तेवर नुकतंच ईडीने (ED) टाच आणली आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली. या कारवाईनंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध होत असल्याचं दिसत आहे. यानंतर आता संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut On Devendra Fadnavis)

संजय राऊत म्हणाले, ”तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारा एक माणूस ज्याने देशाची महान युद्धनौका, ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची फाळणी झाली. आपलं स्वप्न आपण पूर्ण करु शकलो, त्या युद्धनौकेचा लिलाव मांडला, त्याच्यातून पैशे गोळा केले, लोकांना फसवूण, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांच्या मुलाने, त्याचे पुरावे समोर आले आणि आता बोलतात पुरावे कुठे आहेत, संजय राऊत काहीही बोलतात. अरे तुम्ही काय बोलताय?” असा सवाल संजय राऊत यांनी फडणवीस यांना विचारला आहे. (Sanjay Raut On Devendra Fadnavis)

पुढे संजय राऊत म्हणाले, ”काल फडणवीस म्हणाले आम्हाला नखं कापून शहीद होण्याची सवय आहे, तुम्ही काय कापलं ते सांगा.
या देशासाठी तुमचं काय बलिदान आहे. उलट ज्यांचं बलिदान आहे त्या बलिदानाचा लिलाव करुन तुम्ही पैशे गोळा करता, कधी राममंदिराच्या नावाने पैसे गोळा करता. कधी गंगाजल विकून पैसे गोळा केले. तसेच, आमच्या महाराष्ट्रात आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान त्याचा लिलाव करुन पैसे गोळा केले, अशा भ्रष्ट गुन्हेगाराची तुम्ही वकिली करताय, तुम्ही अभ्यास करुन बोलता असं म्हणता, मग आम्ही सांगतो तो पुरावा नाही का?”

दरम्यान, ‘INS विक्रांतच्या संदर्भात देशभावना, लोकभावना, सैनिकांचं बलिदान याच्याशी खेळ करुन सैनिकांच्या बलिदानाचं बाजारात लिलाव करुन मातृभूमीचा लिलाव करुन भाजपचे महात्मा किरीट सोमय्या आणि त्याचे महापूत्र निल सोमय्या यांच्या एका भयंकर राष्ट्रद्रोही प्रकारच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर काढलं. आणि इतकं होऊनही मला आश्चर्य वाटतं देवेंद्र फडणवीस यांचं राष्ट्रभक्तीची गाणी म्हणतात, राष्ट्रभक्तीची भाषणं देतात, दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती हिंदुत्व शिकवतात,” असं राऊत म्हणाले.

Web Title : Sanjay Raut On Devendra Fadnavis | shivsena mp sanjay raut ask question to bjp leader devendra fadanvis

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल

 

Tara Sutaria Swimsuit Photo | तारा सुतारियानं स्विमिंग सुट घालून दिल्या बोल्ड पोज,
व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा

 

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीनं रिवालिंग साडी नेसून दिल्या किलर पोज, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके..

 

Neha Sharma Bedroom Photo | नेहा शर्मानं केल्या बोल्डनेसच्या सगळ्या हद्दपार, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..!