Sanjay Raut On Nana Patole | संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले – ”नाना पटोलेंच्या हातात असेल तर त्यांनी आपली 42 मतं संभाजीराजेंना द्यावीत”

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Nana Patole | संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati) राज्यसभा निवडणुकीतून (Rajya Sabha Elections) माघार घेतली आहे. शिवसेनेने (Shivsena) शब्द पाळला नसल्याचं म्हणत संभाजीराजेंनी आपण राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. यावरुन आता राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. यानंतर शिवसेना नेते आणि माजी खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Sanjay Raut On Nana Patole)

संजय राऊत दोन दिवस कोल्हापूर (Kolhapur) दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप (BJP) आणि चंद्रकात पाटील (Chandrakat Patil) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी चोंबडेपणा करू नये, चंद्रकांत पाटील काही शिवाजी महाराजांचे वंशज नाहीत,” अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

पुढे संजय राऊत यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावरही निशाणा साधला आहे. ”नाना पटोलेंच्या हातात असेल, तर त्यांनी आपली 42 मते संभाजीराजेंना द्यावीत,” असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, ”या राज्यात विरोधी पक्ष आहे पण ते विरोधासाठी विरोध करताना दिसत आहे. एखादा निर्णय घेतला की त्यावर टीका करायची हे त्यांनी ठरवलं आहे. यातून त्यांना कोणता असुरी आनंद मिळतो काय माहीत नाही, पण त्याची पर्वा न करता महाविकास आघाडी ठामपणे पुढे चालली आहे.” असं राऊत म्हणाले.

Web Title : Sanjay Raut On Nana Patole | shiv sena mp sanjay raut on maharashtra cogress president nana patole over sambhajiraje candidacy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त