Sanjay Raut On Raj Thackeray | संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘योगी यांना…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी दोन्ही सभेत महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) निशाणा साधला होता. यामध्ये त्यांनी खास करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर (NCP & Shivsena) जोरदार टीका केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी 1 मे ला औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा आणि अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut On Raj Thackeray) यांनी राज ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

ज्या अयोध्येमध्ये हे चालले आहेत त्या राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याविषयी आपल्या नेत्याचे वक्तव्य काय आहेत हे पण जरा समजून घ्या. ‘कोण हैं आदित्यनाथ, वो गंजा आदमी भगवे कपडे पहन के घुमता हैं पागल जैसा’ असं म्हणणारे अयोध्येला जात आहेत. आम्हाला बोलायला लावू नका. आता योगी त्यांचे कसे स्वागत करणार आम्ही पाहणार आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

योगी यांना गंजा, टकलू आदमी, भगवे कपडे घालून इकडे तिकडे फिरणारा,
असं बोलणाऱ्यांनी आम्हाला हिंदूत्त्व शिकवण्याची गरज नसल्याचं म्हणत राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी आधी योगींवर जी टीका केली होती त्या टीकेचाच धागा पकडत राऊतांनी ठाकरेंवर प्रतिटीका केली आहे.

 

दरम्यान, राज ठाकरे यांनी ठाण्यातील (Thane) उत्तरसभेमध्ये संजय राऊत यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती.
त्यानंतर आता 1 मेच्या सभेमध्ये राज ठाकरे कोणाला लक्ष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Web Title :- Sanjay Raut On Raj Thackeray | sanjay raut criticize yogi adityanath and mns chief raj thackeray on hanuman chalisa

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा