महाराष्ट्रा पाठोपाठ झारखंड गमवणाऱ्या भाजपला आत्मचिंतनाची गरज : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – झारखंडच्या विधानसभा निकालाकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे. कारण या ठिकाणी भाजपचे सरकार होते. दुपार नंतर अनेक ठिकाणी काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता झारखंडमधून भाजपचे सरकार जाणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. मोदी शहाणी लावलेली ताकद फुकट गेली असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

राम मंदिर उभारणीचा निर्णय आणि CAA या कायद्याचा भाजपला फायदा होईल असे सांगण्यात येत होते मात्र याचा कोणताही परिणाम झारखंडमध्ये दिसून आला नसल्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे झारखंडच्या देखील भाजपला नाकारले असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच भाजपला आता आत्मचिंतनाची गरज असल्याचा सल्ला देखील राऊत यांनी यावेळी भाजपला दिला.

झारखंडमध्ये काँग्रेसची मोठी सरशी पहायला मिळाली तर झारखंड मुक्ती मोर्चाला देखील यावेळी चांगले यश मिळाले आहे. झारखंडच्या निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले. अद्याप पूर्ण निकालाचे चित्र स्पष्ट होणे बाकी असले तरी काँग्रेस सत्तेवर येईल असे वातावरण निर्माण झाले आहे.

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार असले तरी सुरूवातीच्या कलामध्ये भाजपा पिछाडीवर पडली होती. सध्या काँग्रेस-भाजपामध्ये अटीतटीची लढाई असल्याचं चित्र दिसत आहे. प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/