Sanjay Raut | राज्यपालांच्या शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारत जोडो यात्रे (India Jodo Yatra) दरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. राज्यात मनसे (MNS), भाजप (BJP), शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राहुल गांधी विरोधात आंदोलन केलं. यातच आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असे विधान कोश्यारी यांनी केले. याच मुद्यावरुन संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं विधान केलं आहे. आम्हाला काय करायचे आहे, ते आम्ही लकरच करु असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

शिवाजी महाराजांचे आदर्श हे चिरंतन आहेत. ते जुने कसे होऊ शकतात. याआधी कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याविषयी असेच वक्तव्य केले होते. आता शिवाजी महाराज यांच्याविषयीही त्यांनी असेच वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर सध्या वादळ उठले आहे. भाजपचे लोक राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. जे आज रस्त्यावर उतरले आहेत, त्या सर्वांनी आता राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरुन आपला मराठी बाणा, स्वाभिमान दाखवावा. आम्हाला काय करायचे आहे, ते आम्ही लवकरच करु, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

काय म्हणाले राज्यपाल?
औरंगाबाद मधील एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी म्हणाले, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो,
तेव्हा आणचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे,
ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींची नाव घ्यायचे.
मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की, तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही.
इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय.
डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरी पर्यंत (Dr. Nitin Gadkari) सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut comment on rahul gandhi veer savarkar comment and bhagatsingh koshyari comment on chatrpait shivaji maharaj

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | विचार सोडून आमच्यासोबत या म्हटलं नव्हतं, काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं

MNS | राज्यपालांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार; छत्रपती शिवाजी महाराज कायम आदर्श राहतील

Pune Pimpri Crime | घराशेजारी राहणाऱ्या महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना