Sanjay Raut | गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचं संजय राऊतांकडून समर्थन; म्हणाले – ‘हा तर हेमा मालिनी यांचा सन्मान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत बोलताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एक वक्तव्य केलं होतं. ‘माझ्या मतदारसंघात हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत रस्ते आहेत. तसे रस्ते नसतील तर राजीनामा देतो, असं ते म्हणाले होते. या वक्तव्यामुळे भाजप (BJP) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी आपल्या वक्तव्याची माफी मागितली. तर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र गुलाबराव पाटील यांच्या विधानाचे समर्थन केल्याचे पाहायला मिळाले.

 

अभिनेत्री व भाजपच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संजय राऊत म्हणाले, ‘गुलाबरावांच्या वक्तव्यात काहीही वावगं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘गुलाबरावांच्या वक्तव्याकडं मी नकारात्मक दृष्टीनं बघत नाही. अशा प्रकारची तुलना यापूर्वी देखील झालेली आहे. हा एक प्रकारे हेमा मालिनी यांचा सन्मान आहे. यापूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad yadav) यांनीही असंच उदाहरण दिलं होतं. हेमा मालिनी यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे, असं ते (Sanjay Raut) म्हणाले.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
‘माझ्या मतदारसंघात हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत रस्ते आहेत.
तसे रस्ते नसतील तर राजीनामा देतो, असं सांगत, महाराष्ट्राला ज्ञान पाजणार्‍यांनी आधी आपल्या मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करावेत,
असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला होता. या वक्तव्यानंतर भाजपने आक्षेप घेतला.
त्याचबरोबर गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा कारवाई करू,
असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिला होता.
त्यानंतर धुळे जिल्ह्यातील साक्री येथील प्रचारसभेत गुलाबराव पाटील यांनी वक्तव्याबद्दल माफी मागितली.
बोलण्याच्या ओघात तसं म्हणालो होतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut backs gulabrao patil comment says we respect hema malini

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fastag Monthly Pass | रिचार्जच्या त्रासापासून होईल सुटका, ‘या’ सोप्या पद्धतीने ताबडतोब बनवा FASTag चा मंथली पास

Eknath Khadse | ‘माझ्यापुढे शेपटी हलवणारे मला विचारतात 30 वर्षात तुम्ही काय केलं?’ टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं’ – एकनाथ खडसे

Kajal Aggarwal Pregnancy News | ‘सिंघम गर्ल’ काजल अग्रवालचा बेबी बंपचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर रंगल्या तिच्या गरोदरपणाच्या चर्चा..