Sanjay Raut | शिवसेना मावळ मतदारसंघ पार्थ पवारांना देणार ?, खासदार श्रीरंग बारणेंनी दिला सूचक इशारा, तर संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | राज्यातील आगामी निवडणुकांमुळे (Election) आतापासूनच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मावळ लोकसभा मतदारसंघ (Maval Lok Sabha constituency) अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांना द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केली होती. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देशमुख यांच्या मागणी नंतर खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, मावळ मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) अद्याप अधिकृतपणे भूमिका मांडली नाही. त्यामुळे एखादा कार्यकर्ता भावनेच्या भरात बोलतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जर अशा प्रकारची मागणी झाली तर शिवसेना (Shivsena) काय भूमिका घेणार ? यावर राजकीय वर्तुळाच चार्चा रंगली आहे.

 

राऊत पुढे म्हणाले, पार्थ पवार हे तरुण कार्यकर्ते आहेत. ते राजकारणात काम करत आहेत. पार्थ पवार यांच्या राजकीय भविष्याचा विचार त्यांचा पक्ष करेल. आमच्याकडे काही प्रस्ताव (Proposal) आला तर आम्ही त्यांच्या नेत्यांशी चर्चा करु, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी या मुद्यावर शिवसेनेशी चर्चा करणार का ? हे पहावे लागेल.

श्रीरंग बारणे नाराज, म्हणाले…
शिवसेनेनं आगामी निवडणुकांसाठी मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार यांना द्यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लॉबिंग सुरु झाली आहे.
यावर बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्याने ही मागणी केली हे माहिती नाही. मुळात ही मागणी करण्यात आली की करायला लावली, अशी शंकाही श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केली.
लोकसभा निवडणुकीला अद्याप दोन वर्षाचा कालावधी बाकी आहे.
मग आत्तापासून ही मागणी का केली जात आहे. दोन वर्षात बरीच स्थित्यांतर होऊ शकतात,
असा सूचक इशाराही श्रीरंग बारणे यांनी दिला.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut explanation on giving shivsena maval constituency to partha ajit pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा