Sanjay Raut | शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप मोठा झाला का? संजय राऊत म्हणाले – ‘भाजपने काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Leader Sachin Sawant) यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि शरद पवारांनी विविध राजकीय घडामोडींवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. संजय राऊत यांनी या कार्यक्रमात एका महत्त्वाच्या प्रश्नावर उत्तर दिलं. माहाराष्ट्रात शिवसेनेच्या (Shivsena) खांद्यावर बसून भाजप मोठा झाला का? या प्रश्वावर संजय राऊत यांनी सविस्तर उत्तर दिलं.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, तुमच्या प्रश्नाला मी सहमत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेच्या (Maharashtra Shivsena) मदतीने भाजप (BJP) पक्ष वाढला हे नक्कीच खरं आहे. परंतु तुम्ही एक लक्षात घेतलं का, भाजपची आज जी ताकद दिसतेय, विधानसभा (Assembly) किंवा लोकसभा  (Lok Sabha) असेल, त्यातील 75 टक्के लोक हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून गेलेले आहेत. त्यांनी काँग्रेसवाल्यांना हाफ चड्डी घातली आहे. हा मुळ विचार नाही. यामुळे तो विचार किंवा विष महाराष्ट्रत वाढतंय, असं नाही. त्यांनी काही लोकांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी सामील करुन घेतलं. 2024 च्या आधी त्यांचं अर्ध दुकान खाली होणार आहे. हाफ चड्डी घालणारे फुल पँट शिवायला टाकणार असल्याचे मिश्किल उत्तर त्यांनी दिलं.

संजय राऊत पुढे म्हणाले, आपण म्हणता की, संघाचं मुख्यालय नागपूर मध्ये आहे. पण विषय समजून घेतला पाहिजे. नागपूर (Nagpur) हा काँग्रेसचाच बालेकिल्ला राहिलेला आहे. नागपूरला वर्षानुवर्षे काँग्रेसचा माणूस पार्लिमेंटला निवडून जात होता. आता एखाद दुसरं वर्ष अपवाद आहे. त्यामुळे त्यांचा फार प्रभाव नव्हता. वर्धा, भंडारा, चिमूर या जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार (Congress  MLA) निवडून आले. नंतर शिवसेनेचे आमदार निवडून आले. भाजपचे उमेदवार अलिकडच्या काळात निवडून यायला लागले. त्यामुळे नागपूर मुख्यालय असल्याने काही फरक पडला नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut tell how bjp expand in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ACB Trap On Ganesh Jadhav | अवैध वाळू वाहतूकीसाठी 1,50,000 ची लाच घेताना तहसीलदारासह खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात

 

NCP Chief Sharad Pawar | ‘मी म्हटलं, कुसुम काय चाललंय? तिचा चेहरा फुलला’, शरद पवारांनी सांगितला ‘तो’ फॉर्म्युला

 

पत्नीच्या नावावर उघडा NPS अकाऊंट ! रू. 5000 च्या गुंतवणुकीवर रू. 1,11,98,471 मिळतील, रू. 44,793 / महिन्यांच्या पेन्शनचा सुद्धा फायदा