×
Homeताज्या बातम्याSanjay Raut | जितेंद्र नवलानीवर FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले...

Sanjay Raut | जितेंद्र नवलानीवर FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘भविष्यात आमच्या सारख्या लोकांना फार मोठी किंमत चुकवावी लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) या नावाचा उल्लेख करुन या व्यक्तीने खंडणी (Ransom) गोळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आरोपानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) जितेंद्र नवलानी याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. नवलानी याने ईडी (ED) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नावाने आतापर्यंत सुमारे 59 कोटी रुपयांची रक्कम स्विकारल्याचा आरोप आहे. यासंदर्भात संजय राऊत पुण्यामध्ये (Pune) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले देशभरात तपास यंत्रणांचे जे काम चालू आहे त्याबाबत सत्य बाहेर आणण्याचे काम सुरु आहे.

 

महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जितेंद्र उर्फ ‘जीतू’ नवलानी याच्या विरोधात ईडीच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन काम करत असल्याचा दावा करुन अनेक व्यावसायिकांकडून तब्बल 59 कोटी रुपये गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याआधी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोप केला होता की, नवलानी, ईडीच्या तीन अधिकाऱ्यांसह, विशिष्ट व्यावसायिकांना लक्ष करुन खंडणी रॅकेट चालवत होते आणि त्यांना पैशाच्या बदल्यात ईडी चौकशीपासून संरक्षण देत होते. राऊत यांनी मुंबईतील बिल्डर्स (Builder) आणि व्यावसायिकांकडून 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, नवलानी हा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Mumbai Former CP Parambir Singh) यांचा सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.

नवलानी याच्याविरुद्ध मुंबई एसीबीने (Mumbai ACB) गुन्हा दाखल केल्यानंतर संजय राऊत पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्र पोलिसांना काम करु द्या. त्यामध्ये जे सत्य असेल ते योग्यवेळी बाहेर येईल. जितेंद्र नवलानी आणि इतरांवर जे आरोप आहेत ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) संदर्भात आहेत. देशभरात तपास यंत्रणांचे काम चालू असून त्यासंदर्भात सत्य बाहेर आणण्याचे काम चालू आहे. त्याची भविष्यात आमच्या सारख्या लोकांना फार मोठी किंमत चुकवावी लागेल याची आम्हाला माहिती आहे, असे राऊत म्हणाले.

 

दरम्यान, मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांची प्राथमिक चौकशी करण्यात आली.
चौकशीमध्ये आरोपी जितेंद्र नवलानी व इतर यांनी विविध खाजगी कंपन्यांकडून,
अंमलबजावणी संचलनालय विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून काम करण्याच्या मोबदल्यात कोट्यावधी रुपये घेतले.
आरोपीने 2015 ते 2021 या कालावधीमध्ये तब्बल 58 कोटी 96 लाख 46 हजार रुपये स्विकारले.
खाजगी कंपन्यांकडून घेतलेले पैसे जितेंद्र नवलानी याने त्याच्या नावावर असलेल्या आणि मालकी व नियंत्रणामधील Briefcase Company/Shell Company या कंपन्यांच्या माध्यमातून Unsecured Loans व Consultancy Fees च्या स्वरुपात घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp and leader sanjay raut reaction after the case was filed against jitendra navlani

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Must Read
Related News