वर्षाच्या भिंतीवरील लिखाणावरून राजकीय ‘राडा’, लिहिणार्‍यांचं तोंड काळं झालं, संजय राऊतांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सत्तापालट झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आता उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. सत्ताबदलानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून वादाची ठिणगी पडली आहे. अशातच मुंबईतील मुख्यमंत्री बंगल्यावर म्हणजेच वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात आली आहेत.

भिंतींवर लिहिलेल्या मजकुरावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या वादात उडी घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, ‘मी हा मजकूर पाहिलेला नाही. मी कधी वर्षा बंगल्यावरही गेलो नाही. काही मजकूर असेल तर तो रंगरंगोटी करून मिटवता येईल. मात्र ज्या लोकांनी असा मजकूर लिहिला आहे, त्यांचं तोंड मात्र आता काळं झालं आहे.’

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला रिकामा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बंगल्यात राहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. परंतु वर्षा बंगल्यातील खोलीतील भींतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहलं असल्याची माहीती आता समोर येतेय. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे डर्टी पॉलिटिक्स असल्याचं म्हटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/