Sanjay Raut | ‘सोमय्यांची माणसं राजभवनात बॅकडेटेड कागदपत्रं बनवत असून ते देशाबाहेर पळून जाणार’; राऊतांचा गंंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणावरून (INS Vikrant Financial Embezzlement Case) शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्यांवर (Neil Somaiya) आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यासोबतच सोमय्या देशाबाहेर पळून जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

 

आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणातील (INS Vikrant Financial Embezzlement Case) सोमय्या पिता – पुत्रांना वाचवण्यासाठी भाजपकडून बनावट पुरावे (False Proof) तयार करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे कालपासून किरीट सोमय्या यांची माणसं राजभवनावर (Raj Bhavan) जाऊन मागच्या तारखेची काही कागदपत्रं तयार करत आहेत. राजभवनाने या देशविरोधी कृत्यामध्ये सामील होऊ नये अन्यथा राजभवनाची उरलीसुरली अब्रूही जाईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut)

 

भाजपने या प्रकरणावर आपली कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. म्हणजे भाजप या घोटाळ्याचं समर्थन करत आहे का ?. असा प्रश्न मला पडला असल्याचं राऊत म्हणाले. किरीट सोमय्या देशाबाहेर पळून जाणार असल्याची माझ्याकडे पक्की माहिती असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

 

भाजपने सोमय्यांना महाराष्ट्राबाहेर लपवून ठेवलं आहे. मेहुल चोक्सी आणि किरीट सोमय्या यांची जुनी दोस्ती आहे.
त्यामुळे सोमय्या अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत देशाबाहरे पळून जाऊ शकतात, असं म्हणत राऊतांनी टीकेचे बाण सोडले आहेत.
यावर सोमय्या काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | Somaiyas men are making backdated documents in Raj Bhavan and they will flee the country Rauts serious allegations

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा