Sanjay Raut | संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यावर थेट घरी जाणार नाहीत, तर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते (Shivsena) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कथित गोरेगाव पत्राचाळ भूखंड प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने (PMLA Cour) जामीन दिला आहे. त्यामुळे आज (दि. 09) सायंकाळी संजय राऊत (Sanjay Raut) यांची आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) सुटका होणार आहे.

 

यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड कारागृहाबाहेर गर्दी जमू लागली आहे. तसेच त्यांच्या मुलुंड येथील निवासस्थानी देखील त्यांच्या स्वागताला कार्यकर्ते आणि कुटुंबीय सज्ज झाले आहेत. पण संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर थेट घरी न जाता, ते सिद्धीविनायक मंदिरात जाणार असल्याची माहिती आहे. तसेच ते शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत.

 

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना, विशेष न्यायालयाने ईडीला फटकारले आहे. ईडीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना केलेली अटक बेकायदेशीर होती, असे मत विशेष पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयाने नोंदविले आहे. तसेच सक्तवसुली संचलनालयाने (ED) आपल्या मर्जीतील आरोपी निवडले. मुख्य आरोपी असलेल्या राकेश सारंग, एचडीआयएल, म्हाडा आणि सरकारी अधिकाऱ्यांना ईडीने अटक केली नाही, असे देखील न्यायालयाने म्हंटले आहे. ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचेही मत न्यायालयाने मांडले आहे.

संजय राऊत यांचा जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटात आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राऊतांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच संजय राऊत यांचे बंधू यांनी आज आमच्यासाठी दिवाळी असल्याचे म्हंटले आहे.
शिवसैनिकांमध्ये हत्तीचे बळ आले आहे. आज आमचा सेनापती मुक्त झाला आहे,
असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या आहेत.

 

Web Title :- Sanjay Raut | uddhav thackeray phone call to sanjay raut after getting bail by pmla court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Radhakrishna Vikhe Patil | ‘भारत जोडो’ यात्रा नसून जत्रा आहे – राधाकृष्ण विखे पाटील

MP Sanjay Raut | ‘सत्यमेव जयते! टायगर इज बॅक’, संजय राऊतांच्या सुटकेनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया, जणून घ्या कोण काय म्हणाले?

Supriya Sule | संजय राऊत यांच्या सुटकेने न्यायावरील आमचा विश्वास अढळ राहिला – सुप्रिया सुळे (VIDEO)