Sanjay Shirsat on Saamana | सामनामध्ये आता किडे, झुरळ पहायला मिळतात, संजय शिरसाटांची खोचक शब्दात टीका

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Shirsat on Saamana | शिवसेनेत बंडखोरी (Shiv Sena Rebellion) झाल्यानंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) असा संघर्ष बघायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) गटाचे मुखपत्र असलेल्या सामना मधून शिंदे गटावर टीका करण्यात येत आहे. याच सामनावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. सामनात आता किडे, झुरळ पाहायला मिळत असल्याचा टोला शिरसाट यांनी लगावला आहे. (Sanjay Shirsat on Saamana)

संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सामनात आता किडे, झुरळ पहायला मिळतात. सामनात यापूर्वी कधी राहुल गांधीचे (Rahul Gandhi) फोटो छापले जात नव्हते. परंतु आता राहुल गांधी हे त्यांचे फ्रंट पेज झाले आहे. त्यामुळे सामना कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, हे आजच्या मुखपृष्ठवरून तुम्हाला दिसत असेल. (Sanjay Shirsat on Saamana)

मविआ बैठकीवर भाष्य

महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीवर निशाणा साधताना संजय शिरसाट म्हणाले, विरोधकांच्या बैठकीत काय निष्पन्न होईल हे पाहणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आता महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचे चित्र दिसतं. त्यामुळे आज बैठक झाल्यावर त्यांची दिशा सुद्धा आम्हाला कळेल, असे संजय शिरसाट म्हणाले.

न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे

राहुल गांधी यांना न्यायालयाने (Court) पुन्हा खासदारकी बहाल केली आहे. यावर भाष्य करताना शिरसाट म्हणाले, न्यायालयाचा निकाल तुमच्या विरोधात लागला की, तुम्ही म्हणता न्यायदेवतेवर आमचा विश्वास नाही. न्यायालय हे सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेले आहे. मात्र, आता तुमच्या बाजूने निकाल लागल्यावर तुम्ही जल्लोष करत आहात. अशा लोकांना न्यायालयाने दिलेली ही चपराक आहे. या देशात कोणीही लोकशाही विकत घेऊ शकत नाही, याचेही हे उदाहरण आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णयाचा सन्मान केला पाहिजे, असे शिरसाट म्हणाले.

कोरोनात त्यांची दुकानदारी सुरू होती

मुंबई कोविड घोटाळ्याप्रकरणी (Mumbai Kovid Center Scam) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर
(Former Mayor Kishori Pednekar) आणि मुंबई महानगरपालिकेतील
(Brihanmumbai Municipal Corporation (BMC) दोन वरिष्ठ अधिकाऱ्यावर (BMC Senior Officers) गुन्हा (FIR)
दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले, कोविड मधील हे गंभीर प्रकरण आहे.
कोवीडमध्ये अनेकांचे प्राण जात असताना, आपली दुकानदारी कशी चालेल याकडे लक्ष केंद्रीत केले होते.
त्यामुळेच आता पेडणेकर यांची चौकशी होत असल्याचे शिरसाट म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Encounter In Kulgam | कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; लष्कराचे 3 जवान शहीद; शोध मोहीम सुरूच

India Alliance Meeting | ‘इंडिया’ची तिसरी बैठक मुंबईत, राहुल गांधींसह अनेक नेते उपस्थित राहणार; संजय राऊतांची माहिती (व्हिडीओ)

Yoga For Healthy Hair | केस गळती रोखण्यापासून वाढीपर्यंत, उपयोगी ‘हे’ 3 योगासन, रोज सकाळी करा सराव

Maha Arogya Camp In Pune | कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबिर ! एक लाख रुग्णांची तपासणी आणि उपचारासाची सुविधा उपलब्ध