भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन  – भारतीय जनता पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष आणि दै निर्भीड आपलं मत चे संपादक संजय वाईकर ( वय 52 ) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू होते.

संजय वाईकर यांना 10 दिवसांपूर्वी कोरोना झाल्याचा अहवाल आला होता. त्यांच्यावर वाखरी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू केले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली गेल्याने सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले होते. तिथे रक्तदाब आणि शुगरचे प्रमाण खालावल्याने सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

संजय वाईकर यांनी सुमारे 15 वर्षे पत्रकारिता केली. मागील 3 वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबियांवर आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.