सपना चौधरीचा जिम मधील हॉट व्हिडीओ झाला व्हायरल ; व्हिडीओ पाहून चाहते झाले वेडे 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सपना चौधरी फक्त तिच्या नृत्यासाठीच नव्हे तर आपल्या फिटनेस देखील ओळखली जाते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी सपना जिममध्ये खूप मेहनत घेते. तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप मेहनत घेताना दिसून येतेय. सपना चौधरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओला खूप सारे व्हीऊज मिळाले आहेत.
https://www.instagram.com/p/BxZcw5-hyds/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओत सपना वेगळ्याच रूपात पहायला मिळत आहे. फिटनेससाठी ती प्रशिक्षकाचीही मदत घेताना दिसत आहे.  भोजपुरी, पंजाबी आणि हरियाणवी चित्रपटात धम्माल उडवून देणारी  सपनाच्या या व्हिडिओला अनेक लोकांची पसंती मिळत आहे.

सपना चौधरीच्या डान्सचे आपल्या देशाबरोबरच विदेशात देखील खूप चाहते आहेत. देशाच्या विविध भागातून तिला डान्स करण्यासाठी बोलवले जाते. नुकतेच तिने बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये डान्स परफॉर्मन्स दिला आहे. बिग बॉस नंतर सपना चौधरीच्या यशाचा आलेख उंचावत चालला आहे. सपना चौधरी हिने दोस्ती के साइड इफेक्ट्स या चित्रपटात धम्माल उडवून दिली होती.