‘सारा अली खान’ का म्हणते की मला अमृता सिंहची मुलगी म्हणा ? जाणून घ्या !

पोलीसनामा ऑनलाईन : असं म्हणतात की मुलीच्या आयुष्यात ‘बाप’ असा व्यक्ती असतो जो तिला कधीही डगमगू देत नाही. तो बापच असतो जो आपल्या मुलीला समाजात खांद्याला खांदा लावून चालणे शिकवतो. म्हणूनच मुलींना वडिलांची परी म्हटले जाते. तथापि, बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानच्या बाबतीत असे नाही. सारा तिची आई अमृता सिंहशी वडील सैफ अली खानपेक्षा जास्त जवळ आहे.

सारा आणि तिची आई अमृता सिंह यांच्यातील ताळमेळ केवळ त्यांच्या दिसण्यापूरता आणि आवडी निवडी पुरताच मर्यादित नाही तर सारा प्रत्येक गोष्ट तिच्या आईबरोबर शेअर करण्यात अजिबात संकोच करत नाही. आई अमृता साराच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा आहे. सारा अनेकदा सोशल मीडियावर अमृता यांच्या सोबतचे फोटो शेअर करुन आपले आई प्रती असलेले प्रेम व्यक्त करत असते.

साराला जर विचारले गेले की तिचे कुटुंबातील सर्वात जास्त प्रेम कोणावर आहे किंवा सर्वात जास्त तिला कोण जवळचे आहे, तर सारा वेळ न दवडता तिच्या आईचे नाव घेते. अगदी लहान वयातच साराने तिच्या आई आणि वडिलांमधील घटस्फोट होताना पाहिला आहे. लहानपणापासून ते आतापर्यंत अमृता सिंह यांनीच साराचे पालन पोषण केले आणि तिला मोठे केले.

एका मुलाखतीत सारा म्हणाली- माझ्या आईने मला अगदी एका सेकंदासाठीही कुठल्याही प्रकारची कमी भासू दिली नाही. जेव्हा मी आणि माझा भाऊ जन्माला आलो तेव्हापासून तिने आमची काळजी घेण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही. माझे वडीलही आमच्या दोघांपासून एका फोनच्या अंतरावर आहेत. जेव्हा आम्हाला त्यांची गरज भासते तेव्हा ते आमच्यासाठी हजर असतात. माझ्याकडे वडिलांसारखी बुद्धी आणि आईसारखे अंतःकरण आहे.

सारा म्हणाली की माझी आई माझे संपूर्ण जग आहे. मी त्यांच्याशिवाय काहीही करू शकत नाही. मी काय परिधान करावे इथपासून तर त्यांना ट्रेलर कसा वाटला ? हा मुलगा चांगला आहे का ? अशा सर्व बाबतीत त्यांचे मत मला सर्वात महत्वाचे वाटते. मी पूर्णपणे एका आईची मुलगी आहे. सारा स्वत:ला सैफपेक्षा अमृता सिंहची मुलगी म्हणणे पसंत करते.

अमृता सिंह देखील साराची खूप काळजी घेत असतात. अलीकडेच अंमली पदार्थात उघड झालेल्या साराच्या नावानंतर जरी तिचे वडील सैफ अली खान आणि त्यांची दुसरी पत्नी करीना पटौदी हाऊस येथे गेले असतील. सैफ जरी करिनासोबत लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करत असेल, पण अमृता सिंह आपल्या मुलीच्या या कठीण काळातही तिच्यासमवेत उभ्या आहेत.