जुळी मुलं जन्मला घातल्यानंतर त्रस्त झाली अभिनेत्री सारा खान, म्हणाली – ‘दिवसभर रडायचे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लव का है इंतजार और ढूंढ लेगी मंजिल हमें, या टीव्ही सिरियलमध्ये काम केलेली अभिनेत्री सारा अरफीन खान हिने सध्या प्रोफेशनल लाईफपासून ब्रेक घेतला आहे. ती सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे आणि मुलांच्या संगोपनात गुंतली आहे. साराने मागच्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिलाय. ती सध्या भारतात आहे. तिने आई झाल्यानंतर कसा संघर्ष केला याबाबत मुलाखतीत सांगितले.

सारा म्हणाली, 7 वर्षांपूर्वी माझे मिसकॅरेज झाले. मला खुप अडचणींचा सामना करावा लागला. मला ठिक होण्यासाठी खुप वेळ लागला. मी एक दिवस काम करत होते, आणि त्यावेळी मला जाणवले की, हा प्रवास कधी ना कधी थांबणारा आहे. मला ब्रेक घेऊन कुटुंबाला वेळ देण्याबाबत विचार केला पाहिजे. मला माहित होते की, मी अ‍ॅक्टिंग पुन्हा कधीही करू शकते.

सारा आपल्या जुळ्या मुलांची खुप काळजी घेते. त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते. पण सारा म्हणते आई बनण्याचा तिचा हा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेक अडचणींचा सामाना करावा लागला. ती बेबी ब्लूज ( डिलिव्हरीच्या नंतर मूड स्विंग्स)ने त्रस्त होती. आई झाल्यानंतर तीन महिन्यात साराला डिहाईड्रेशनमुळे हॉस्पिटलाइज्ड व्हावे लागले.

सारा म्हणाली, आई होणे जगातील सर्वात सुंदर अनुभवांपैकी एक आहे, पण मला खुप अडचणींना तोंड द्यावे लागले. मी थकले होते आणि रोज रडत असे. यातून सुटका करण्यासाठी मी थेरेपी जॉईन केली.

भारतात परत आल्याचा अनुभव सांगताना सारा म्हणाली, जेव्हा मी भारतात आले तेव्हा लागोपाठ 20 दिवस मी आराम केला. यानंतर हळूहळू मी काम सुरू केले. माझ्यासाठी गरोदरपणात वाढलेले वजन कमी करणे महत्वाचे होते. आता मी ठिक आहे आणि पुन्हा अभिनय क्षेत्रात परतण्यासाठी उत्सुक आहे. पण मला चांगल्या रोल्सची प्रतिक्षा आहे.

आता मुलांना माझी सवय झाली आहे. मला हेदेखील पहावे लागेल की, माझ्याशिवाय ते कसे राहतील, कसे वागतील. वजन कमी करण्यासाठी येणार्‍या दबावाबाबत सारा म्हणाली, मी कुणालाही याची सुट देत नाही की, कुणी माझ्यावर यासाठी दबाव टाकावा.

जुळ्या मुलांची आई बनल्यानंतर आश्चर्य वाटते की, देवाने महिलांचे शरीर किती रहस्यमय बनवले आहे. जीवन दिल्यानंतर मी माझ्या शरीराच्या कमतरता कशा काढू शकते. मी वेळ घेईन आणि माझे शरीर पुन्हा आपोआप ठिक होईल, पहिल्याप्रमाणे फिट होईन. मी स्वतासाठी आणि माझ्या मुलांसाठी निरोगी आणि तंदुरूस्त राहणार आहे. माझे जीवना आता मुलांच्या अवती-भवतीच फिरतेय.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like