Sara Sachin Tendulkar | ‘या’ खास व्यक्तीसोबत सारा तेंडुलकर गोव्यानंतर लंडनमध्येही, वाचा सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- Sara Sachin Tendulkar | प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रीय असलेली पाहायला मिळते. सारा आपले फोटो शेअर करच असते, तिला मॉडेलिंगची आवड आहे. आपल्या सुंदर फोटोंमुळे ती चर्चेत येते. मात्र आता ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. साराने (Sara Sachin Tendulkar) इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली होती मात्र त्या स्टोरीमध्ये असलेल्या एका व्यक्तीमुळे साराबाबत चर्चा होत आहेत.

 

गेल्या वर्षाच्या अखेरीस ती सुट्टीसाठी गोव्याला (Goa) गेली होती. तिथे ती एका खास व्यक्तीसोबत दिसली होती. या फोटोमध्ये जीपच्या (Jeep) फ्रंट सीटवरील दरवाज्यावर उभी असलेली दिसत असून तो व्यक्ती फोटो घेत आहे. तर आता साराने शनिवारी रात्री एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली ज्यामध्ये तीच व्यक्ती तिच्यासोबत लंडनमध्ये (London) दिसली. संबंधित व्यक्तीचं नाव सिद्धार्थ केरकर (Siddharth Kerkar) असं आहे.

शनिवारी सारा तेंडुलकरने (Sara Sachin Tendulkar) तिच्या इंस्टाग्रामवर हॅपी वीकेंड (Weekend) लिहित एक स्टोरी ठेवली होती. त्यामध्ये मार्टिना (Martina) आणि सिद्धार्थ हे सारासोबत दिसले. त्यानंतर आणखी एक स्टोरी होती त्यात ते तिघेही हसताना दिसत आहेत. त्यामध्ये लंडन असं कॅप्शन दिलं होतं.

दरम्यान, याआधी 17 नोव्हेंबर 2021 मध्ये सिद्धार्थ आणि साराचा एक फोटो व्हायरल झाला होता.
तो फोटो गोव्याचा होता आता पुन्हा एकदा सिद्धार्थ आणि सारा लंडनमध्ये दिसल्याने अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

 

Web Title :- Sara Sachin Tendulkar | sara tendulkar spotted with siddharth kerkar in london after goa see sachin tendulkar daughter

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा